कठोर कारवाईने समाजकंटक हादरले, रेतीमाफियांनाही चाप, २ कोटी २५ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 02:39 AM2018-09-25T02:39:08+5:302018-09-25T02:41:01+5:30

पालघर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्या नंतर अवघ्या दोन महिन्यातच पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी बेकायदेशीर दारू प्रकरणी १०३ प्रकरणात ११४ आरोपी विरोधात कारवाई

harsh action against Sandimafia | कठोर कारवाईने समाजकंटक हादरले, रेतीमाफियांनाही चाप, २ कोटी २५ लाखांचा ऐवज जप्त

कठोर कारवाईने समाजकंटक हादरले, रेतीमाफियांनाही चाप, २ कोटी २५ लाखांचा ऐवज जप्त

Next

पालघर - जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्या नंतर अवघ्या दोन महिन्यातच पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी बेकायदेशीर दारू प्रकरणी १०३ प्रकरणात ११४ आरोपी विरोधात कारवाई करीत ५४ लाख ९३ हजार ७०० रुपये तर जुगारावर १७ प्रकरणात २४६ आरोपी वर कारवाई करीत १ कोटी ७० लाख ७३ हजार ७१ अशी एकूण २ कोटी २५ लाख ६६ हजार ७७१ रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाई मुळे अवैध धंद्यावाल्या सोबत त्यांना अभय देणाऱ्या पोलीस अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यातील डहाणू, पालघर, तलासरी, वाडा या तालुक्यात गुटखा, दारू, गांजा आदी अवैध धंदे वाढत असून वसई तालुक्यात खून, अपहरण, खंडणी, चोºया आदी बेकायदेशीर प्रकरणात मोठी वाढ झाली होती. जिल्ह्यात ढासळत चाललेल कायदा व सुव्यवस्थेची घडी रोखण्याचे आव्हान पोलीस अधीक्षकांनी उचलले होते. त्यासाठी त्यांनी प्रथम बेकायदेशीर कृत्यांना पाठिंबा देणाºया काही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना खड्यासारखे वेचून काढीत त्यांच्या बदल्या जिल्हा कंट्रोल रूम आदी ठिकाणी केल्या होत्या.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा बेकायदेशीर कृत्यासाठी आजपर्यंत ओळखला जात असून इंधन चोरी, बेकायदेशीर शस्त्रांची विक्री, अपहरण, दरोडे यांचे प्लॅन याच मार्गावर उभारण्यात आलेल्या काही हॉटेल, ढाबे वर रचले जात होते. सातीवली जवळील एका पडक्या घरात लपवून ठेवण्यात आलेले आरडीएक्स, वाडा, पालघर, तलासरी येथे सापडलेले मादक द्रव्याचे मोठे साठे शोधून काढण्यात स्थानिक पोलिसांना अपयश आल्याने अधीक्षक सिंग यांच्या पुढे कार्यक्षम पोलीस अधिकारी, कर्मचाºयांची फळी उभी करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. तलासरी चेक पोस्ट वरून दमण, सिल्वासा येथून येणारी चोरटी दारू महामार्गएवजी अन्य गाव पाड्यातील रस्त्या मधून जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर पाठविले जात आहेत.
पालघर, वसई, डहाणू तालुक्यातील रेती बंदरातून काही महसूल कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने सुरू असलेली रेती चोरी रोखीत सुमारे ६ कोटी ९५ लाख ९८ हजार २०० रुपयांची रक्कम शासन दरबारी जमा करीत बेकायदेशीर रेती व्यवसायाचे कंबरडेच त्यांनी मोडण्यात बºयापैकी यश मिळविले आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात गावठी दारूचे अड्डे अनेक वर्षांपासून कार्यरत असून दारू, गांजा आदी सारख्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधीन बनत असून बिअर शॉपीच्या आड परिमटरु म वजा व्यवस्था उभी करून तरुणांना व्यसनेच्या आहारी घातले जात आहे. त्यामुळे व्यसनाधीनता वाढत असल्याने हे रोखण्यासाठी अधीक्षक सिंग यांनी कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

गुन्हेगारांवर कडक कारवाई

दारू बंदी,दाखल गुन्हे १०५, उघड गुन्हे १०३, एकूण आरोपी अटक ११४,जप्त माल रक्कम ५४ लाख ९३ हजार ७०० रु पये
जुगार दाखल गुन्हे १७ उघड गुन्हे १७, एकूण
आरोपी २४६ जप्त माल १ कोटी ७० लाख ७३ हजार
७१ रु पये
वाहन चोरी, घरफोडी, ४५ गुन्हे १ कोटी ७९ लाख ६८ हजार ८९४ रु पये
रेती ६ कोटी ९५ लाख ९८ हजार २०० रु पये

Web Title: harsh action against Sandimafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.