बुडणाऱ्या नातीला वाचविले आजीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:52 PM2018-10-21T23:52:59+5:302018-10-21T23:53:01+5:30

वसई पूर्व मधील भालिवली येथील पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत पडलेल्या नात आर्याला क्षणाचाही विचार न करता आजीने विहिरीत उडी घेऊन तिला वाचविले.

The granddaughter saved the drowning granddaughter | बुडणाऱ्या नातीला वाचविले आजीने

बुडणाऱ्या नातीला वाचविले आजीने

Next

नालासोपारा : वसई पूर्व मधील भालिवली येथील पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत पडलेल्या नात आर्याला क्षणाचाही विचार न करता आजीने विहिरीत उडी घेऊन तिला वाचविले. ही घटना शुक्रवारी घडली असून आजी मंजुळाच्या प्रसंगावधानाने नातीचा जीव वाचला आहे. आज्जीबाईचं सध्या वसईत जोरदार कौतुक होत आहे.
आजी ही आपल्या पतीसोबत गावापासून दूर असलेल्या शेतातील घरात मुलगा जितेश व त्याची पत्नी जोत्स्ना सह राहत आहे. शुक्र वारी मंजुळा हि शेतात एकटीच काम करीत असतांना चांदीप येथील सासरी असलेली तिची मोठी बहीण शकुंतला ही नातीला घेऊन मंजुळाला भेटायला आली. त्यामुळे मंजुळा मोठी बहीण व नातं यांना घेऊन घराकडे निघाली. मात्र पायवाटेने येत असतांना रस्त्याला लागूनच असलेल्या व काठोकाठ भरलेल्या विहीरीत नात आर्या पडली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आजीने विहिरीत झेप घेतली नातीचा हात हातात येताच तो धरून तिने तातडीने विहिरीचा काठ गाठला. काठाला असलेला लोखंडी पाईप एका हाताने पकडून दुसºया हाताने नातीला डोके वर असलेल्या स्थितीत पकडून ठेवले. मोठी बहिण शकुंतलाने आरडाओरडा करून बाजूला काम करणाºयांना बोलाविले. त्यांनी धाव घेऊन मंजुळाला व आर्याला बाहेर काढून नातीच्या पोटातील पाणी बाहेर काढले.

Web Title: The granddaughter saved the drowning granddaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.