महामार्गावर वाहने लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 02:03 AM2018-08-18T02:03:32+5:302018-08-18T02:04:04+5:30

डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गवर रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन गाड्यांना लुटणाऱ्या टोळीला मोठया शिताफीने कासा पोलिसाने पकडले आहे.

Gangs Arrested | महामार्गावर वाहने लुटणारी टोळी जेरबंद

महामार्गावर वाहने लुटणारी टोळी जेरबंद

Next

कासा -  डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गवर रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन गाड्यांना लुटणाऱ्या टोळीला मोठया शिताफीने कासा पोलिसाने पकडले आहे. या संबंधी माहिती देण्यासाठी कासा पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी या दरोड्यांची माहिती दिली
मागील चार दिवसांपूर्वी सुरेंद्र रघूनंदन चौधरी हा ट्रकचालक मुंबई दहिसर येथून माल रिकामा करून परत वापी कडे जात असताना कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचपाडा येथे रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास गाडी बंद पडल्याने थांबला होता. अचानक तीन मोटारसायकल वर आठ आरोपी तेथ आले व त्यापैकी चार जण जबरदस्तीने ट्रक च्या केबिनमध्ये चढून गाडीतील व्हील पान्ह्याने लोखंडी (सळई) ने मारहाण करून त्याचा जवळील गाडी भाड्याचे ४२००० (बेचाळीस हजार) रोख मोबाईल, लायसन्स व इतर कागदपत्रे असा सुमारे ४७००० (सतेचाळीस हजार)किंमतीचा एैवज घेऊन पसार झाले. दरम्यान त्यातील दोन आरोपी पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी हॉटेल रॉयल इन येथे दबा धरून बसले होते
या प्रकाराबद्दल ट्रक चालक सुरेंदर चौधरी यांनी कासा पोलिसात तक्र ार दाखल केल्यानंतर कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे व सहकारºयांनी २४ तासात आरोपींना अटक केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार महामार्गवर सकाळी बंद पडलेली मोटारसायकल महामार्गवर मिळाली असून त्यावरून तपासाची चक्र ेफिरवत पोलिसांनी राजेश जाण्या बरफ (२६) रा.सावरखांड, मनोर ता.पालघर, योगेश दत्तू दुमाडा (१८) रा.ऐबुर ( टोकेपाडा) ता.पालघर, राहूल दत्तू दुमाडा (२१) रा. ऐबुर (टोकेपाडा) ता. पालघर, रोशन सदानंद धानवा (२१) रा. आवढे कोळीपाडा , ता. वाडा, योगेश नामदेव गवळी (२३) रा.सावरा (गवळीपाडा) ता.पालघर, संजोग राजेंद्र दुमाडा (१७) रा. ऐबुर (टोकेपाडा), ता.पालघर, रु चित अनंता खाचे (१७) रा. ऐबुर (नवापाडा) ता पालघर, योगेश सुदाम लिपड (१७) रा. सावरे (ब्राह्मणपाडा ) ता पालघर, एकनाथ काळूराम गणेशकर (२०) रा. नांदगाव (मोहपाडा )ता पालघर, साईनाथ काळूराम गणेशकर (२३) रा.नांदगाव ( मोहपाडा) ता.पालघर या दहा आरोपींना अटक केली असून यातील तिघा अल्पवयीनांना बालसुधारगृहात धाडले आहे.

तिघे आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी

अल्पवयीन आरोपींपैकी एक जण दहावीमध्ये शिक्षण घेणाारा विद्यार्थी आहे .तर उर्वरित सात जणांना कोर्टाने सात दिवसाची पोलीस कोठडी सणावली आहे. आरोपींनी आतापर्यंत महामार्गवर अनेक वाहन चालकांना लुटले असल्याचा संशय असून त्यापैकी गणेशकर हे दोघे भाऊ गाड्या लुटण्याचा प्लॅन करायचे व पोलिसांवर पाळत ठेवायचे तर इतर आरोपीने वाहन चालकांना लूटल्यावर सर्व जन हॉटेलवर एकत्र येऊन पैसे वाटून घेत असत. मात्र, अखेर कासा पोलिसांनी या टोळीला पकडून मुसक्या आवळल्या आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे करत आहेत. या भागातील राज्य महामार्गावर अशा टोळ्या अनेकांना लुटत असल्याची माहिती असून त्या विरोधात पोलीस काय कारवाई करतात हे महत्वाचे आहे. दरम्यान, तिघे अल्पवयिन गुन्हेगार असून त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहामध्ये केली आहे. सोनवणे यांनी इतर आरोपींची चौकशी सुरु केली आहे.

Web Title: Gangs Arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.