Ganesh Visarjan 2018 : डहाणूत विसर्जनावेळी तेलमिश्रित पाण्याने भक्तांचे हातपाय काळवंडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 07:20 AM2018-09-24T07:20:40+5:302018-09-24T07:21:32+5:30

अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला.

Ganesh Visarjan 2018: During the Dahanut immersion, the hands of the devotees of Telengana | Ganesh Visarjan 2018 : डहाणूत विसर्जनावेळी तेलमिश्रित पाण्याने भक्तांचे हातपाय काळवंडले

Ganesh Visarjan 2018 : डहाणूत विसर्जनावेळी तेलमिश्रित पाण्याने भक्तांचे हातपाय काळवंडले

googlenewsNext

- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी - अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबई व पालघर जिल्ह्याच्या किनाऱ्यावर मृत मासेही आढळले होते. 

तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्ये अरबी समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. रविवार, 23 सप्टेंबर रोजी चिखले गावातील गावड भंडारी समाजाच्या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक रात्री साडेआठच्या सुमारास गावच्या रिठी या चौपाटीवरील विसर्जन घाटावर पोहचली. त्यानंतर सामूहिक आरती झाल्यावर मूर्ती  विसर्जनाकरिता भक्त पाण्यात उतरले.  मूर्तीचे विसर्जन होताच,  ओंजळीत पाणी घेऊन ते बाप्पाला वाहिल्यानंतर, नमस्कार करून पुढील वर्षी लवकर येण्याची विनंती करण्याची पूर्वापार श्रद्धा येथील भक्तांची आहे.  

दरम्यान निरोप देऊन हे भक्त पुन्हा किनाऱ्यावर परतल्यानंतर त्यांच्या हाताला तेलयुक्त चिकटपणा आल्याचा प्रत्यय आला. त्यापैकी अशोक पांडुरंग गावड या साठ वर्षीय भक्ताने लाईटच्या उजेडात दोन्ही हात धरल्यावर ते काळवंडले होते. त्यांनी ही माहिती सोबत असलेल्यांना सांगितली. त्यांनाही हाच अनुभव आला. तर काही भक्तांच्या कपड्यांना तेलमिश्रित डाग लागल्याची माहिती, तेथे उपस्थित चिखले ग्रामपंचायत सदस्य किरण गणपत पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

 दोन दिवसांपूर्वीच मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील काही किनाऱ्यावर मृत मासे आढळले होते. समुद्राच्या पाण्यात दूषित तेलमिश्रित तवंग पसरून चिकटपणा वाढला आहे. हा समुद्री पर्यावरणाला धोक्याचा इशारा असून या बाबत शासनाने तात्काळ पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा सागरी जैवविविधता धोक्यात येईल अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

"समुद्रातील पाणी ओंजळीत घेऊन ते वाहिल्यानंतर नमस्काराकरिता हात जोडले. काही वेळाने लक्षात आले कि, हाताला तेलकटपणा आला आहे. ते लाईटच्या उजेडात धरल्यावर काळवंडले होते. घरी जाऊन तीन ते चार वेळा साबणाने हात स्वच्छ धुतल्यावर हा चिकटपणा गेला. हा अनुभव पहिल्यांदाच आला असून ही पर्यावरणाकरिता धोक्याची घंटा आहे." 
अशोक पांडुरंग गावड(चिखले गावातील गणेशभक्त)

Web Title: Ganesh Visarjan 2018: During the Dahanut immersion, the hands of the devotees of Telengana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.