गणपती विसर्जनाची मिरवणूक ३ तास रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:51 AM2018-09-22T05:51:27+5:302018-09-22T05:51:45+5:30

शहरात सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान पालघर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद पवार यांनी वाजंत्री साहित्याला लाथा मारून महिलांना धक्काबुक्की केल्याने गणेशभक्तांनी सुमारे ३ तास मिरवणूक रोखून धरली.

Ganapati immersion procession spent 3 hours | गणपती विसर्जनाची मिरवणूक ३ तास रखडली

गणपती विसर्जनाची मिरवणूक ३ तास रखडली

Next

पालघर : शहरात सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान पालघर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद पवार यांनी वाजंत्री साहित्याला लाथा मारून महिलांना धक्काबुक्की केल्याने गणेशभक्तांनी सुमारे ३ तास मिरवणूक रोखून धरली. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पालघर-टेम्भोडे रस्त्यावर वाजंत्री व बेंजोच्या तालावर नाचणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी रोखून वाजंत्री बंद करण्याच्या सूचना केली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील परिपत्रकात चूक झाल्याने गौरी विसर्जनाच्या ऐवजी सातवा दिवस नमूद करण्याचे राहून गेल्याने आपण आम्हाला नियमाप्रमाणे १२ वाजे पर्यंत नाचू द्या अशी विनंती उपस्थित लोकांनी केली. मात्र पालघर पोलिसांनी त्याला नकार दिल्याने संतप्त झालेल्या लोकांनी रात्री ९ ते १२ अशी सुमारे ३ तासा साठी मिरवणूक रस्त्यातच थांबवून आपला रोष व्यक्त केला. या वेळी पोलिसांनी शीघ्रकृतीदल, दंगल नियंत्रक पथकासह पोलीस अधीक्षक, आदी मोठी टीम नियंत्रणासाठी सज्ज ठेवण्यात आली होती.

Web Title: Ganapati immersion procession spent 3 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.