शंभर एकर जमीन विक्रीचा फ्रॉड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:20 AM2018-08-19T03:20:36+5:302018-08-19T03:22:10+5:30

न्यायालयाकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेश : नऊ दलाल गळाला, अधिकाऱ्यांचाही समावेश?

Fraud for sale of 100 acres of land | शंभर एकर जमीन विक्रीचा फ्रॉड

शंभर एकर जमीन विक्रीचा फ्रॉड

Next

बोर्डी : जमीन व्यवहार प्रकरणी फसवणूक झाल्याचा दावा एका महिलेने डहाणू न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने नऊ दलालांविरु द्ध डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक परबकर यांनी दिली. या प्रकरणानंतर अन्य बेकायदेशीर जमीन व्यवहार समोर येऊन, जमीन घोटाळा गाजण्याची चर्चा रंगू लागली आहे.
या प्रकरणानंतर घडामोडींना वेग आला असून जमीन घोटाळा, त्या मध्ये समावेश असलेले जमिनीचे दलाल, शासकीय अधिकारी गुंतले असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. दरम्यान, तालुक्यातील गंजाड् सोमनाथ, गणेशबाग तसेच बोंडगाव व नागझरी येथील शंभर एकर जमीन बेकायदेशीररित्या विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बोंडगाव, नागझरी येथे प्रमोद किर्णक व कुटुंबियांची ६८ एकर जमीन आहे. किर्णक व्यवसायानिमित्त मुंबईला राहतात. त्याचा गैरफायदा घेत भोला उर्फ शीतल चोरिडया, नरेश ठाकोरभाई पटेल व त्यांचे सहकारी या दलालांनी हा सर्व बनाव घडवून आणला. त्यांनी मूळमालकांची जमीन तीन खोटे दस्ताऐवज बनवून मुनावर खान, अफरीम खान, दिनेश जैन, विनता जैन यांच्या नावावर करून १६ लक्ष ५५ हजारांना विक्री करून फसवणूक केल्याची चर्चा आहे. त्याच प्रमाणे गंजाड् सोमनाथ, गणेशबाग येथील मुळमालक अमित पटेल, अंकित मेहेता, नरेश दोषी, विमल मेहता आहेत. त्यांची ३२ एकर जमीन बनावट ओळखपत्र व कागदपत्रांच्या आधारे कीर्ती जैन, मुमताज खान यांना सहा लाखांना विकण्यात आली. या करता मूळमालकांची बनावट ओळखपत्र तयार करून बँकेत खाते उघडण्यात आले होते. हा एकूण १०० एकरचा जमीन घोटाळा झाल्याची कबुली डहाणूचे प्रभारी दुय्यम निबंधक जयशंकर सोरडे यांनी दिली आहे. त्यामुळे या दस्ताऐवजांची नोंदणी करताना झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी झाल्यास शासकीय अधिकारी गळाला लगणार आहेत.

कोट्यवधीची जमीन २३ लाखांत विक्री
तालुक्यातील चंद्रकला चोरिडया या महिलेने जमीन व्यवहारात घोटाळा होऊन फसवणूक झाल्याचा डहाणू न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याबाबत न्यायालयाने डहाणू पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार भोला उर्फ शीतल चोरिडया, अहमद खान, प्रशांत जवंतरे, कीर्ती जैन, राकेश जैन, दिनेश जैन, मुनावर खान, महेंद्र केनिया, मोतीलाल जैन या नऊ दलालांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. त्यांची चौकशी होणार आहे.

या करिता दलालांनी मूळ मालकांची खोटी निवडणुक ओळखपत्र व आधारकार्ड बनवून विक्र ीचा व्यवहार करून कोट्यावधी रु पयांचे बाजारमूल्य असलेली जमीन सुमारे २३ लाख रुपये या कवडीमोल भावात विक्र ी करण्यात आली आहे.

डहाणू न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर डहाणू पोलिस ठाण्यात नऊ जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - जे.एस परबकर,
पोलीस निरीक्षक डहाणू पोलिस ठाणे

शंभर एकर जमिनीचा व्यवहार बनावट कागदपत्रांच्या आधारे झाला आहे. त्या व्यवहारात झालेला चुकीचा फेरफार रद्द करणात येईल व चौकशी केली जाईल.
- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू

Web Title: Fraud for sale of 100 acres of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.