मजुरी मागणाऱ्यावर रोखले पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:51 PM2019-04-23T22:51:02+5:302019-04-23T22:56:23+5:30

वनअधिकाऱ्याची दांडगाई; घाबरलेल्या मजुरांना श्रमजीवीचा आधार

forest officer raised pistol on Labour who demands wages | मजुरी मागणाऱ्यावर रोखले पिस्तूल

मजुरी मागणाऱ्यावर रोखले पिस्तूल

googlenewsNext

वाडा : येथील वनविभाग ( पश्चिम) कार्यालयाच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम काही आदिवासी मजुरांनी काम केले होते. त्या कामाची मजुरी मागायला गेलेल्या या मजुरांवर वनविभाग पश्चिमचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांनी आपल्याकडील पिस्तूल रोखत दबंगगीरी केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

तालुक्यातील वनविभाग ( पश्चिम) कार्यालया अंतर्गत येणाºया आबिटघर परिसरातील वनक्षेत्रात शासनाच्या वृक्षलागवडीच्या अभियानाकरिता खड्डे खोदाईचे काम हाती घेण्यात आले होते. या कामावर डिसेंबर २०१८ मध्ये आबिटघर येथील भरत गोविंद जाधव, भाग्यश्री भरत जाधव, आंबो बापू खुताडे, सखाराम गोविंद जाधव या मजूरांनी काम केले होते. या कामाची मजुरी आजवर वनविभागाने दिली नाही. म्हणून हे आदिवासी मजूर मंगळवारी वनविभाग (पश्चिम) कार्यालयात जाब विचारणा करण्यासाठी गेले असता वन परिक्षेत्र अधिकारी तोंडे यांनी मजुरीचे पैसे देण्याऐवजी या मजूरांवर थेट पिस्तुल रोखून धमकावल्याची घटना घडली.

या घटनेने भयभीत झालेल्या या आदिवासी मजूरांनी श्रमजीवी संघाटनेच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणे गाठले असून सायंकाळी उशीरापर्यंत तक्रार नोंदविण्यासाठी हे मजूर व श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ पोलिस ठाण्यात बसून होते. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी तोंडे हे देखील पोलिस ठाण्यात हजर होते. दरम्यान तोंडे हे विक्रमगड येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असून वाडा वनविभाग (पश्चिम) चा अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यासंदर्भात तोंडे यांच्याशी संपर्क साधला असता मी गनपॉकीट मधुन पिस्तुल काढून माझ्या कमरेला ठेवले. मी कोणत्याही मजुरावर पिस्तुल रोखले नसून माङया विरोधात ते बनाव करीत आहेत. उलट माझ्या वर ते हल्ला करण्याच्या तयारीत होते असा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: forest officer raised pistol on Labour who demands wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.