भरावामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास होतोय नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:26 AM2019-07-18T00:26:46+5:302019-07-18T00:26:54+5:30

परदेशातून लाखो किलोमीटर्सचा प्रवास करून आपल्या भागात येणा-या पक्षांच्या वास्तव्याच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भराव घालून पाणथळ जागा नष्ट केल्या जात आहेत.

Flamingos are domiciled because of the payment | भरावामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास होतोय नष्ट

भरावामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास होतोय नष्ट

Next

पालघर : जिल्ह्यातील वसई, पालघर तालुक्यातील पाणथळ जमिनीवर दरवर्षी येणाऱ्या रोहित उर्फ फ्लेमिंगो, रुडी शेल्क डक आदी परदेशातून लाखो किलोमीटर्सचा प्रवास करून आपल्या भागात येणा-या पक्षांच्या वास्तव्याच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भराव घालून पाणथळ जागा नष्ट केल्या जात आहेत. त्यामुळे या परदेशी पाहुण्याना भविष्यात आपल्याला मुकावे लागणार आहे.
तालुक्यातील पालघर तालुक्यातील केळवे, माहीम, एडवन, दातीवरे, सफाळे तर वसई तालुक्यातील काही पाणथळ जमिनीवर ब्लॅक हेड इबिस, पेंटेड स्टॉर्क, रुडी शेल डक, ग्लॉसी इबिस, स्पून बिल, लेसर व्हिसलींग डक आदि परदेशातून लाखो किलोमीटरचा प्रवास करून येणाºया पक्ष्यांचे वास्तव्य दिसून येत असते. येथील मिठागरे, पाणथळ जमिनीत मिळणारे नानाविध प्रकारचे खाद्य आणि निर्मनुष्य वस्ती, जीवितास नसणारा धोका आदी कारणामुळे जिल्ह्यातील अनेक पाणथळ जमिनी या पक्षांची आवडती ठिकाणे बनली आहेत. सध्या केळवे येथील मिठागरा जवळील भागात ३०० ते ४०० च्या संख्येने फ्लेमिंगी आले आहेत. त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पर्यावरण प्रेमी, पक्षी प्रेमी, हौशी छायाचित्रकारांच्या टीम भेटी देत आहेत. परंतु या पाणथळ जागेत सध्या मोठ्या प्रमाणात भराव घातला जात असल्याने भविष्यात ह्या पक्षांच्या अधिवासांची ही ठिकाणे नष्ट होण्याची भीती सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्रोफेसर भूषण भोईर यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.
पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी देशातील पाणथळ (वेटलँड) जमिनीचे सॅटेलाइटद्वारे सर्वेक्षण करून ते संरिक्षत करण्याचे महत्वपूर्ण काम केले होते. मात्र सरकार बदलल्या नंतर भाडेपट्यावर असलेली मिठागरे आणि पाणथळ जमिनीवर बिल्डर लॉबीची वक्र दृष्टी पडली.
>अनेक पाणथळ जमिनी झाल्यात नष्ट
या व्यावसायिकांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरूनघालण्यात आलेले निर्बंध उठविण्यात यश मिळविले. त्यामुळे अनेक भागातील पक्षांच्या वास्तव्याची ठिकाणे असलेल्या मिठागरे, पाणथळ जमिनीवर मोठमोठे भराव या जमिनीवर घालून त्या जमिनीवर काँक्र ीट ची जंगले वाढू लागली आहेत.जिल्ह्यात ८७ पाणथळ जमिनी शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाºयांना या जमीनी बाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिल्याने जिल्हाधिकाºयांनी पर्यावरण प्रेमींच्या स्वयंसेवक म्हणून नेमणुका केल्याने सर्वांनी यावर काम करण्यास नकार दिल्याचे प्रो.भोईर यांनी सांगितले.

Web Title: Flamingos are domiciled because of the payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.