डहाणूतील विशाल ट्रेडर्स मॉलमध्ये अग्नितांडव, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 07:40 AM2018-03-14T07:40:41+5:302018-03-19T12:57:51+5:30

डहाणूतील कासा येथील विशाल ट्रेडर्स मॉलला भीषण आग लागली आहे.

fire at vishal traders in kasa village dahanu | डहाणूतील विशाल ट्रेडर्स मॉलमध्ये अग्नितांडव, एकाचा मृत्यू

डहाणूतील विशाल ट्रेडर्स मॉलमध्ये अग्नितांडव, एकाचा मृत्यू

googlenewsNext

पालघर : डहाणूतील कासा या ठिकाणी असलेल्या विशाल ट्रेडर्स मॉलला भीषण आग लागली आहे. या मॉलमधून सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर एकजण मॉलमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. यामध्ये मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होते आहे. तेलाचे ड्रम, धान्य गोदाम असल्याने आग आणखी वाढली होती.

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरु आहे.विशाल ट्रेडर्स ही दोन मजली इमारत आहे. कासा शहरातील हा मोठा मॉल आहे. पहाटे तीनच्या दरम्यान अचानक आग लागली आग अजूनही भडकलेली आहे. ग्राऊंड फ्लोअरवर मॉल, पहिल्या मजल्यावर गोडाऊन्स आणि दुसऱ्या मजल्यावर रहिवासी घरे या इमारतीत आहेत. आग नेमकी का लागली ते स्पष्ट झालेले नाही. मात्र ही आग नियंत्रणात आणण्याचे कसोशीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

या घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य बाजारपेठेत हा मॉल असल्याने दुसऱ्या दुकानांना आगीची झळ पोचू नये म्हणून अग्निशमन दलाकडून विशेष काळजी घेण्यात आली.दरम्यान, गेल्या 15 दिवसांत कासा परिसरात आग लागण्याची ही तिसरी घटना आहे.  



 



 

Web Title: fire at vishal traders in kasa village dahanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग