विद्यार्थ्यांचा तरफ्यावरून जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:01 AM2019-07-16T01:01:03+5:302019-07-16T01:04:22+5:30

जीवघेणा प्रवास करून शाळा गाठण्याची कसरत या तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजूबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थ्यांना गेली अनेक वर्षे करावी लागत आहे.

Fatal travel on students' behalf | विद्यार्थ्यांचा तरफ्यावरून जीवघेणा प्रवास

विद्यार्थ्यांचा तरफ्यावरून जीवघेणा प्रवास

googlenewsNext

- वसंत भोईर 
वाडा : शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने जीवघेणा प्रवास करून शाळा गाठण्याची कसरत या तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजूबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थ्यांना गेली अनेक वर्षे करावी लागत आहे. विद्यार्थांना पहिलीपासूनच हा जीवघेणा व धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
तालुक्यांचे ठिकाण असलेल्या वाडा शहराजवळील ऐनशेत गावाजवळून वाहणाऱ्या वैतरणा नदीच्या पलीकडे असलेल्या विलकोस या गावातील ग्रामस्थ या नदीवर पूल व्हावा यासाठी गेली २५ वर्षे संघर्ष करत आहेत. वैतरणा नदीच्या पलिकडे असलेल्या अनेक गावांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी हा एकदम जवळचा मार्ग आहे. उन्हाळयÞात ग्रामस्थ व विद्यार्थी नदीला पाणी कमी असल्याने नदीपलीकडे जाऊ शकतात. या ग्रामस्थांना वाडा शहराची बाजारपेठ जवळ पडत असल्याने दैनंदिन कामकाज, व्यवहार व रोजगारासाठी जाणे-येणे नियमितपणे या नदीपात्रातून सुरु असते. पावसाळ्यÞात मात्र या नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने नदीपलीकडे जाणे शक्य होत नाही. त्यांना १५ ते २० किलोमीटर अंतर वळसा घालून वाडा येथे जावे लागते.
या नदीवर पूल नसल्याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विलकोस गावातील आणि आजूबाजूच्या पाड्यांमधील सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी दररोज वाडा शहरातील शाळा, महाविद्यालयांत शिक्षणासाठी येतात. नदी पार करण्यासाठी पूल नसल्याने बांबू अथवा प्लास्टिक पाईप एकत्रित बांधून तयार केलेल्या ताप्यावरु न जीवघेणा प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर दरवर्षी येते. मात्र नदीची पातळी खोल असल्याने हा प्रवास कधीही जीवावर बेतणारा ठरू शकतो, याची कल्पना असतांना शिक्षणाच्या ओढीने हे विद्यार्थी हा संघर्ष अविरत करत असल्याचे १३ वीत शिकणाऱ्या अक्षय याने सांगितले.
विलकोस आणि ऐनशेत गावादरम्यान वैतरणा नादीवरील हा पूल झाला तर तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावे तालुक्याचे ठिकाण असलेल्या वाडा शहराला जोडले जाऊन तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी या गावांतील नागरिक व विद्यार्थ्यांचे १५ ते २० किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. त्याचबरोबर परिसरातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनाही हा पूल फायदेशीर ठरणार आहे. मात्र सध्यातरी शिक्षणासाठी करावा लागणारा रोजचा हा जीवघेणा प्रवास केव्हा थांबणार असा सवाल विद्यार्थी करीत असून वैतरणा नदीवर ऐनशेत येथे पूल बांधा ही मागणी वर्षानुवर्षाची आहे. परंतु अद्याप पुलाला चालना मिळाली नाही.
या पूलाच्या बांधकामासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय कामांमध्ये मंजूर झाला आहे. परंतु प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी त्यानंतर निविदा प्रक्रि या यासाठी आणखी किती कालावधी जाईल हे निश्चित नसल्याने व प्रशासकीय कामकाजात होणारी दिरंगाई आणखी किती वर्ष हा जीवधेणा संघर्ष या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतोय हे सांगता येणे कठीण आहे.
>आम्ही पहिलीपासून आता दहावीपर्यंत या तरफ्यावर प्रवास करतो आहोत. नदीला पूर आला तर त्या दिवशी आम्ही शाळेत जात नाही. अशा वेळेस आमचे शैक्षणिक नुकसान होते. तरफ्यावरचा हा प्रवास आमच्या पाचवीलाच पुजला आहे.
- निर्जला मोरे, विद्यार्थिनी
>ऐनशेत-पिंपरोळी या १२० मीटर लांबीच्या पुलाला मंजुरी मिळाली असून प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ते होऊनपावसाळ्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.
- प्रकाश पातकर, कनिष्ठ अभियंता,सार्वजनिक
बांधकाम विभाग, वाडा

Web Title: Fatal travel on students' behalf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.