अतिवृष्टी बाधितांना भरपाई मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:34 AM2018-07-23T02:34:05+5:302018-07-23T02:34:26+5:30

सरकारचे संकेत; तहसीलशी साधा संपर्क

Extreme people will get compensate? | अतिवृष्टी बाधितांना भरपाई मिळणार?

अतिवृष्टी बाधितांना भरपाई मिळणार?

Next

वसई : या तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रहिवाशी आणि व्यापाऱ्यांना भरपाई मिळण्याचे संकेत वसईच्या तहसिलदारांनी दिले असून, बाधितांना तलाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ही केले आहे.
दि.९ ते ११ जुलैच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई तालुक्यातील हजारो घरांमध्ये पाणी शिरले होते. तीन-चार दिवस हे पाणी ठाण मांडून राहिल्यामुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, बिछाने, कपडे, अन्न-धान्याची नासाडी झाली होती. प्रत्येक घरातील किमान ५० हजार ते दोन-चार लाखांचे नुकसान झाले होते.तसेच व्यापाºयांचाही लाखो रु पयांचा माल सडला होता.
शेतकºयांची ही भातशेती या पुरामुळे वाहून गेली होती. अशा या बाधितांना तहसिलदारांच्या आवाहनानुसार शासनाकडून भरपाईचा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान तालुक्यातील ज्या नागरिकांच्या घरात दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साचून नुकसान झाले, त्यांनी जवळच्या तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करून घ्यावा. ज्यांच्या शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. त्यांनी सुद्धा कृषी सहाय्यकांकडून पंचनामा करावा. तसेच दुकानदार, व्यापारी, कारखानदार यांनीही शासकिय यंत्रणेकडून पंचनामे करून घ्यावे. त्यामुळे विमा क्लेम करणे अधिक सोपे होईल. आदी असे आवाहन वसई तहसिलदार किरण सुरवसे यांनी केले आहे.

Web Title: Extreme people will get compensate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.