हुसेन मेमने / जव्हार
संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे भ्रष्टाचार चव्हावाट्यावर आल्यानंतर गेल्या ४ महिन्यांपासून पदभार स्वीकारलेल्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता वसईकर आपलेपण हात काळे होतील म्हणून जव्हार कार्यालयात येतच नसत, मात्र बुधवारी वसईकर हजर झाले अन सां.बा. कार्यालयासमोर ठेकेदारांच्या वाहनांची गर्दी होऊन ट्रॅफिक जाम झाला ठेकेदार म्हणाले एकदाचा साहेब आला अन देव पावला !
गेल्या काही महिन्यांपासून भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या जव्हारचा सां. बां. विभागात ओस पडला असून ठेकेदारांवर उपासमारीची वेळ येउन ठेपली आहे, या विभागाच्या अखत्यारीत जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी, डहाणू व पालघर अशा एकूण सात तालुक्यांचा कार्यभार आहे, मात्र कार्यकारी अभियंता मात्र नेहमीच गायब असतात. गेल्या सोमवारी विक्रमगड विधानसभेचे आमदार तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा काही रस्त्यांचे व पुलाचे भूमीपूजन करण्यासाठी आले होते, मात्र यावेळीही कार्यकारी अभियंता वसईकर गैरहजर होते, त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीबाबत कार्यकर्त्यांच्या गोटात अशी कुजबूज सुरू होती की, मंत्र्यांच्या कार्यक्रमालाही जर ते गैरहजर राहत असतील तर त्यांच्या कार्यालयात काय चालत असेल ? जर ते जव्हारला येतच नसतील तर कामांचा दर्जा कसा तपासला जाईल ? तसेच लोकमेतनेही जव्हारचे कार्यकारी अभियंता गायब या मथळ्या खाली बातमी प्रसिध्द केली होती.