पालघर जिल्हयात भूकंपाचे हादरे; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 07:38 PM2019-02-01T19:38:51+5:302019-02-01T19:40:14+5:30

याआधी २४ जानेवारी रोजी सकाळी ९.१३ आणि ९.१५ वाजता डहाणू व तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. याआधी बसलेल्या भूकंपांची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी अशी नोंदवण्यात आली होती.

Earthquake strikes in Palghar; Local area fears | पालघर जिल्हयात भूकंपाचे हादरे; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघर जिल्हयात भूकंपाचे हादरे; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

googlenewsNext
ठळक मुद्देसकाळी साधारण ७ वाजताच्या सुमारास या परिसरात ३.३ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले. पालघरमधील डहाणू आणि तलासरी येथे मागील ३ महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज सकाळी बसलेले धक्के हे सौम्य स्वरुपाचे असल्यामुळे कोणतेही मोठं नुकसान झालेलं नाही. तसेच सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पालघर - पालघरमधील डहाणू आणि तलासरी परिसरात आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी साधारण ७ वाजताच्या सुमारास या परिसरात ३.३ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले. पालघरमधील डहाणू आणि तलासरी येथे मागील ३ महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज सकाळीही असाच भूकंपाचा धक्का बसला. याआधी २४ जानेवारी रोजी सकाळी ९.१३ आणि ९.१५ वाजता डहाणू व तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. याआधी बसलेल्या भूकंपांची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी अशी नोंदवण्यात आली होती.

गेल्या दोन महिन्यांपासून गडगडाटी आवाज येत आहे. अजूनही हे आवाज तसेच सुरु असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी बसलेले धक्के हे सौम्य स्वरुपाचे असल्यामुळे कोणतेही मोठं नुकसान झालेलं नाही. तसेच सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Web Title: Earthquake strikes in Palghar; Local area fears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.