परेच्या मार्गावर मेगाब्लॉकमुळे आज वैतागवाडी, रेल्वेच्या ओव्हरहेड लाईनचे काम करण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:18 AM2017-11-05T00:18:49+5:302017-11-05T00:19:46+5:30

आज पश्चिम रेल्वेवर विरार डहाणू रोड दरम्यान रेल्वेच्या ओव्हरहेड लाईनचे काम होणार असल्याने या मार्गावर ब्लॉक असून डहाणू रोडहुन विरारकडे व विरारहून डहाणूरोडकडे जाणा-या गाड्या सकाळी ११.१० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

Due to megabloc on the path of BAD, today the work of Wataagwadi, railway overhead line will be done. | परेच्या मार्गावर मेगाब्लॉकमुळे आज वैतागवाडी, रेल्वेच्या ओव्हरहेड लाईनचे काम करण्यात येणार

परेच्या मार्गावर मेगाब्लॉकमुळे आज वैतागवाडी, रेल्वेच्या ओव्हरहेड लाईनचे काम करण्यात येणार

Next

पालघर : आज पश्चिम रेल्वेवर विरार डहाणू रोड दरम्यान रेल्वेच्या ओव्हरहेड लाईनचे काम होणार असल्याने या मार्गावर ब्लॉक असून डहाणू रोडहुन विरारकडे व विरारहून डहाणूरोडकडे जाणा-या गाड्या सकाळी ११.१० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
डहाणू विरारदरम्यान या वेळेत धावणा-या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या असून यामध्ये डाऊन ११.०९ वाजता वांद्रेहून सुटणारी वांद्रे-वापी शटल, ११.३० वाजता बोरीवलीहून सुटणारी बोरिवली-डहाणू रोड लोकल, ११.५२ वाजताची विरार बलसाड शटल, ११.५० वाजताची चर्चगेट-डहाणूरोड लोकल, १२.२० वाजताची विरार डहाणू रोड व १२.४९ ला विरारहून डहाणूकडे जाणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
त्याचबरोबर मुंबईकडे जाणा-या अप डहाणूहुन सुटणारी १०.०५ वाजताची डहाणू-विरार, ११.१० वाजताची डहाणू विरार, १२.४२ वाजताची डहाणू विरार व १३.२० वाजताची डहाणू-विरार लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या दरम्यान विरारहून डहाणूकडे जाणारी १३.४५ वाजताची डाऊन विरार-डहाणू लोकल २० मिनिटे उशिराने धावेल तर ५९४४९ अहमदाबाद वांद्रे पॅसेंजर आपल्या नियत वेळेनुसार धावेल. या ब्लॉकच्या वेळेत लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस वेळेत धावणार असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Due to megabloc on the path of BAD, today the work of Wataagwadi, railway overhead line will be done.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.