दुष्काळामुळे बळीराजा खचला, काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 05:54 AM2018-11-17T05:54:47+5:302018-11-17T05:55:37+5:30

जव्हार, मोखाड्यात काँग्रेस आक्रमक : ढिम्म सरकारविरोधात रान उठवले

Due to drought, the victims of poorly | दुष्काळामुळे बळीराजा खचला, काँग्रेस आक्रमक

दुष्काळामुळे बळीराजा खचला, काँग्रेस आक्रमक

Next

जव्हार : शेतामध्ये पिक तयार व्हायच्या वेळी पावसाने ओढ दिल्याने जव्हार , मोखाडा व वाड्यातील बळीराजाला आभाळाकडे बघण्याची वेळ आली. उन्हाच्या तलखीने उभे पीक करपले. कित्येकांनी आपल्या शिवाराला स्वत:च आग लावल्याच्या घटना घडल्या. मात्र, सरकारने केलेल्या निरीक्षणा अंती या भागाला दुष्काळगृस्त भागाच्या यादीतून वगळल्याने येथील शेतकरी पुरते खचले असून या विरोधात कॉग्रेस पक्षाने आवाज उठवला आहे. शुक्रवारी शिष्टमंडळाने तहसीलदार संतोष शिंदे यांना निवेदन दिले.

जव्हार, मोखाडा हे तालुके ९७ टक्के आदिवासी लोकवस्तीचे असून, येथील अल्प भूधारक व डोंगराळ भागातील शेती मुळे उत्पन्न सुद्धा पोटा पुरतेच असते. येथील जास्तीत जास्त शेती ही कोरडवाहू शेती आहे. खरीपाची ही शेती पुर्णत: पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीची कामं आटोेपल्यानंतर रोजगारासाठी येथे स्थलांतर सुरु होते. मात्र यंदा उणीपुरी शेतीही धोक्यात आली आहे. त्यातच मायबाप सरकारने जव्हार तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळल्याने शेतकरीवर्ग संकटात आहे.
येथील प्रमुख पिकं भात, नागली, वरई, उडीद, तूर असून या वर्षी गेल्या दोन महिन्यापासून पावसाने अचानक दढी मारल्याने तोंडाशी आलेली पिकं करपून गेली आहेत. या वर्षीची संपूर्ण शेती वाया गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सेनेपाठोपाठ कॉँग्रेस
दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेनी जव्हार तहसीलदारांना निवेदन देवून केली होती. दरम्यान, शुक्रवारी कॉँग्रेसनेही पुढाकार घेतला. यावेळी तालुकाध्याक्ष केशव गावंढा, अ.ज. पालघर जिल्हाध्यक्ष बळवंत गावित, जावेद पटेल, तसेच सागर सातपुते, रोहिदास दांडेकर, मनोज जाधव, संतोष शर्मा तेसच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारविरोधातील आंदोलनाला ग्रामीण भागातून पाठिंबा

च्मोखाडा : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती दिसत असताना सुद्धा पालघर, तलासरी, विक्र मगड या तीन तालुक्याना दुष्काळ ग्रस्त शासनाच्या यादीत स्थान मिळाले आहे. तर वाडा, मोखाडा, जव्हार हे तालुके दुष्काळाने होरपळत असताना सरकार गप्प आहे.

च्या धोरणा विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन रान उठवले असून शेतकºयांच्या हितासाठी पक्षांतील हेवेदावे, मतभेद विसरून मोखाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कॉग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत पालकमंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून निषेधाची होळी पेटवून बोंब ठोकणार आहे.

च्या निषेधार्थ बाजारपेठेतील व्यापारी वर्गानी आपली दुकाने बंद ठेऊन पाठिंबा देण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. तर अनेक शेतकºयांच्या डोळ्यादेखत शेतातील उभी पिके जळाली. तरी सरकारला अजून जाग आलेली नसल्याने आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.

Web Title: Due to drought, the victims of poorly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.