उद्ध्वस्त कुटुंबांना मिळणार १०० टक्के अनुदान, २५० घरांची पडझड, वादळी वा-यासह बरसलेल्या पावसाने किनारपट्टीचे केले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 03:17 AM2017-09-23T03:17:53+5:302017-09-23T03:18:03+5:30

तालुक्यात गेल्या मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-याबरोबरच विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जंगलपट्टीसह बंदरपट्टीभागात सुमारे २५० घरांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पंचनामे झालेल्या पात्र नागरिकांना शंभर टक्के सानुग्रह अनुदान देणार असल्याचे डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी लोकमतला सांगितले.

Disturbed families get 100 percent subsidy, 250 houses collapse, rainy season with rainy season, damaged coastal damage | उद्ध्वस्त कुटुंबांना मिळणार १०० टक्के अनुदान, २५० घरांची पडझड, वादळी वा-यासह बरसलेल्या पावसाने किनारपट्टीचे केले नुकसान

उद्ध्वस्त कुटुंबांना मिळणार १०० टक्के अनुदान, २५० घरांची पडझड, वादळी वा-यासह बरसलेल्या पावसाने किनारपट्टीचे केले नुकसान

Next

डहाणू : तालुक्यात गेल्या मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-याबरोबरच विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जंगलपट्टीसह बंदरपट्टीभागात सुमारे २५० घरांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पंचनामे झालेल्या पात्र नागरिकांना शंभर टक्के सानुग्रह अनुदान देणार असल्याचे डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी लोकमतला सांगितले.
डहाणू तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पश्चिमेकडील आंबोली आणि करंजवीरा या गावांना चक्री वादळाचा फटका बसला असून ४० हून अधिक आदिवासींच्या घरांची छपरे उडून केली तर असंख्य आदिवासींच्या झोपड्याची अन्न, धान्याबरोबरच घरातील साहित्य कपडे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
आंबोली, पाटीलपाडा येथील यशवंत डोंगरकर, प्रकाश उंबरसाडा, सुरज उंबरसाडा, सुभाष गडत्र, रमेश विलास सखाराम उंबरसाडा, विजय उंबरसाडा, सुरेश शेंदडे, मधूतूºया अशी बेघर झालल्या कुटुंबीयांची नावे आहे. गेल्या बुधवारी डहाणूचे सहायक जिल्हाधिकारी आंचल गोयल तसेच डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी वरील ठिकाणी भेट देऊन तलाठी यांनी पंचनामे करण्याची आदेश दिले होते.
पावसाच्या तडाख्याने ठिकठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. डहाणूच्या किनारपट्टीवरील सतीपाडा, डहाणूखाडी, बाडा पोखरण, आसनगाव येथील सुमारे २० घरांची पडझड होऊन नुकसान झाली तर तालुक्यात सर्वात जास्त चक्रीवादळाचा तडाखा वावडा, वानगाव भागातील गाव पाड्यांना बसला आहे. या वादळाच्या ताडख्यात वानगांव, चिंचणी रस्त्याचा दुतर्फा बागायती उदध्वस्त झाल्या आहेत. केळी, फणस, आंबे, भोपळा यांची रोपे उन्मळून पडल्याचे बबन चुरी, धनंजय पाटील, रामचंद्र सावे, सुरेंद्र पाटील, विवेक कोरे यांनी सांगितले.

Web Title: Disturbed families get 100 percent subsidy, 250 houses collapse, rainy season with rainy season, damaged coastal damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.