पारोळ : वाडा येथील जिल्हा परिषद घडलेल्या दुर्घटनेत तन्वी या चिमुरडीला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच वसई पूर्व भागातील वडघर येथील ४७ वर्षाची जि.प शाळेची इमारत धोकादायक झाल्याने पालकाकडून विरोध केल्याने विद्यार्थ्यांवर अंगणात धडे गिरविण्याची वेळ आली आहे
. शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे याबाबत वारंवार दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने प्रशासन याबाबत निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे.

आदिवासींच्या विकासासाठी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांवर अंगणात ज्ञानाचे धडे गिरविण्याची पाळी यावी, ही बाब लज्जास्पद आहे.
- राम पाटील, अध्यक्ष, वसई काँग्रेस
शाळा मोडकळीस येऊन कधीही कोसळेल अशा अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. जिल्हा परिषदेकडे शाळा दुरुस्ती करण्याऐवजी ती बांधून मिळावी अशी आमची मागणी आहे.
- जयवंत पाटील, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वडघर