जिल्हा हागणदारीमुक्तीचा मंत्र्याकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:03 AM2017-10-06T01:03:41+5:302017-10-06T01:04:11+5:30

जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर

Distribution of District Happiness Emotion From Minister | जिल्हा हागणदारीमुक्तीचा मंत्र्याकडून गौरव

जिल्हा हागणदारीमुक्तीचा मंत्र्याकडून गौरव

Next

पालघर : जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर पाणी व स्वच्छता विभागाचे मंत्री बबन लोणीकर ह्यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर ह्यांनी पुरस्काराचा स्विकारला.
जि.प.च्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा ध्यास घेतला होता. ‘शौचालय असेल तरच बोला’ असा फलक आपल्या कार्यालयात लावून त्यांनी हागणदारी मुक्तीसाठी आपण किती संवेदनशील आहोत हे दाखवून दिले होते. २ आॅक्टोबर २०१७ रोजी पालघर जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा शासनाने केली. त्याबद्दल शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाचे मंत्री बबन लोणीकर यांच्या हस्ते मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी ह्या सन्मानाचा स्वीकार केला.
पालघर जिल्ह्यात २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात शौचालय नसलेल्या कुटुंबाची संख्या १ लाख ३३ हजार १५२ इतकी होती. २०१४-१५ मध्ये १४ हजार १६३ शौचालय, २०१५-१६ मध्ये १४ हजार १६१ शौचालय, २०१६-१७ मध्ये ७० हजार २६० शौचालये आणि २०१७-१८ मध्ये २४ हजार ०८८ इतक्या शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले. तसेच ९ हजार ०५ कुटुंबे सामुदायीक व सार्वजनिक शौचालयचा वापर करत आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ५८ ग्रामपंचायती, २०१६-१७ मध्ये १०३ ग्रामपंचायती आणि २०१७-१८ मध्ये ११ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात आल्या.
या मोहिमेला दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी विभागाला विशेष प्रयत्न करावे लागले. अजुनही काही वाढीव कुटूंबे तसेच आदिवासी लोकसंख्या असलेल्या पालघर जिल्ह्यात लोकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी अनके विशेष उपक्र म सातत्याने राबविण्यात भर द्यावा लागणार असला तरी किनारपट्टीवरील गावातून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने तेथे अधिक जोमाने प्रबोधन करावे लागणार आहे. या कार्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पाणी व स्वच्छता विभागच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांनी प्ररिश्रम घेतले.

Web Title: Distribution of District Happiness Emotion From Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.