घनकचरा प्रकल्प हटविण्यासाठी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाची पालिकेवर धडक   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 08:17 PM2018-04-18T20:17:47+5:302018-04-18T20:19:28+5:30

उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महासभेत आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले. 

The Dharavi Island Morcha News | घनकचरा प्रकल्प हटविण्यासाठी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाची पालिकेवर धडक   

घनकचरा प्रकल्प हटविण्यासाठी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाची पालिकेवर धडक   

Next

भार्इंदर - उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महासभेत आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले. 

धारावी बेट जनआक्रोश मोर्चा समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरसेवकांना दिलेल्या निवेदनात गेल्या १० वर्षांपासुन उत्तन घनकचरा प्रकल्पात सुमारे १० लाख टन कचय््रााचा डोंगर उभा राहिला आहे. त्याचा वाद सध्या उच्च न्यायालयासह राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित आहे. लवादाच्या आदेशानुसार पालिकेने महाराष्टÑ प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) निर्देशानुसार कचय््राावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रीया करणे आवश्यक असतानाही पालिकेने त्याचे उल्लंघन केले. एमपीसीबीने हि बाब सतत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने लवादाने पालिकेला १८ महिन्यांत प्रकल्प स्थलांतर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान त्याला विलंब लागण्याची शक्यता हेरुन पालिकेला कचय््राावर तात्पुरती प्रक्रीया करण्याकरीता व्यवस्था करण्याचे आदेश दिले. परंतु, ३० महिने उलटल्यानंतरही पालिकेने कोणतीही हालचाल न करता कचय््राावरील  प्रक्रीयेसाठी ७ वर्षांसाठी परस्पर कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यासाठी एमपीसीबीची परवानगीच घेतली नसल्याचा दावा मोर्चाने निवेदनात केला आहे. सध्या प्रकल्पात टाकण्यात येणाय््राा सुक्या कचय््राातील केवळ प्लास्टिक कचय््रााचेच वर्गीकरण करण्यात येत आहे. ओल्या कचय््राावरील प्रक्रीया पालिकेने अद्याप सुरु केली नसल्याने येत्या पावसाळ्यात कचय््राातील सांडपाणी लोकवस्तीत पसरुन रोगराई पसरण्यासह डोंगराखालील शेती व पाण्याच्या स्त्रोतात मिश्रित होऊन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालिकेने त्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसुन प्रकल्पात कचय््रााचे प्रमाण वाढून त्यातील दुर्गंधीमुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांपासुन स्थानिकांनी हा प्रकल्प हटविण्यासाठी सतत पालिकेकडे पाठपुरावा केला. प्रसंगी न्यायालयात धाव घेतली. परंतु, पालिकेने सर्वांचीच फसगत केल्याचा आरोप कोलासो यांनी केला आहे. हे प्रश्न प्रशासनाला अनुत्तरीत करणारे असल्याचा दावा करीत  लोकप्रतिनिधींनी उत्तनवासियांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या स्थलांतरासाठी येत्या १ मे पासून प्रकल्पात येणाय््राा कचय््रााच्या गाड्या रोखून धरण्याचा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आल्याने पालिकेने येत्या २७ एप्रिलला समितीच्या सर्व सदस्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. मात्र त्यात प्रशासनाकडून सदस्यांचे समाधान न झाल्यास आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे कोलासो यांनी सांगितले.

  या प्रकल्पाच्या स्थलांतराबाबत शिवसेना नगरसेविका शर्मिला बगाजी-गंडोळी व काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी बुधवारच्या महासभेत लक्षवेधी मांडली होती.   त्यावर चर्चा न करताच अक्षय तृतीयेमुळे सभा तहकुब झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहिर केले. त्यामुळे शर्मिला यांनी लक्षवेधीवर चर्चा न केल्यास त्याचा आपण सुरुवातीलाच निषेध नोंदवित असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर चर्चाच झाली नाही. 

Web Title: The Dharavi Island Morcha News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.