डहाणू-विरार ५ वर्षांत ६१३ बळी, ट्रॅक ओलांडणे, दारातून पडणे बेतते जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:40 AM2018-03-07T06:40:53+5:302018-03-07T06:40:53+5:30

डहाणू-विरार दरम्यान रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या ५ वर्षात वेगवेगळ्या अपघातात ६१३ जणांचा बळी गेला आहे.

 Dahanu-Virar: 613 victims in 5 years, crossing track, falling from door to death | डहाणू-विरार ५ वर्षांत ६१३ बळी, ट्रॅक ओलांडणे, दारातून पडणे बेतते जीवावर

डहाणू-विरार ५ वर्षांत ६१३ बळी, ट्रॅक ओलांडणे, दारातून पडणे बेतते जीवावर

Next

- हितेन नाईक
पालघर : डहाणू-विरार दरम्यान रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या ५ वर्षात वेगवेगळ्या अपघातात ६१३ जणांचा बळी गेला आहे.
वसई-विरारची लोकसंख्या वाढल्यामुळे इथला वर्ग पालघर, डहाणूकडे स्थलांतरीत होत आहे. पश्चिम रेल्वेने डहाणूपर्यंतच्या सेवेला उपनगरीय दर्जा दिला असला तरी गाड्यांच्या संख्येत पुरेशी वाढ न झाल्याने इथल्या प्रवाशांना आता ट्रेन च्या दरवाज्यात लटकून प्रवास करावा लागतो आहे. डहाणू-विरार दरम्यानच्या वाढत्या गर्दीमुळे हे अपघाती मृत्यू झाले असून हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाययोजना करीत नाही.
गेली अनेक वर्षे येथील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी संघटना व येथील प्रशासन प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये वाढ घडवून आणण्याबाबत सतत पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. इथल्या प्रवाशांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी येथे यानिमित्ताने होत आहे.
मुंबईतील महागडी घरे परवडत नसल्याने सर्वसामान्यांनी वसई-विरारला पसंती देऊन स्वस्त घरासाठी तो पर्याय निवडला. मात्र येथेही घरांचे भाव वाढत चालल्याने तसेच गर्दी प्रचंड वाढल्याने नागरिकांनी स्वस्त घरासाठी पालघर, बोईसर, डहाणूची निवड केली.
येथील वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण यामुळे रेल्वेमधील गर्दी पूर्वीपेक्षा दुपटीने वाढू लागली. हा नागरीकरणाचा विस्तार येथील रेल्वे सेवांच्या मानाने मोठा असल्याने येथील अपघातात होणारे हे मृत्यू या मागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील बहुसंख्य बळी हे प्रवास करतांना खाली पडणे, लोहमार्ग ओलांडत असतांना धडक बसणे, दरवाजाला लोंबकळून प्रवास करतांना पोलचा फटका बसून खाली पडणे. अशी आहेत.
ती दूर करण्यासाठी रेकची संख्या वाढविणे, त्यांच्या डब्यांची संख्या वाढविणे व पादचारी पुलांची संख्या आणि रुंदी वाढविणे सरकते जीने बसविणे आदी उपाय करण्याची आवश्यकता आहे.

रेल्वेला पर्याय नसल्याने जीवावर उदार

येथील परिसरातील प्रवासी जात असताना रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी व रेटारेटी होते. प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. कारण त्यांना दुसरा पर्यायच उपलब्ध नसतो.

या मार्गावर वाढत असलेले प्रवासी व येथे या पाच वर्षात बळी गेल्याची आकडेवारी पाहता रेल्वे प्रशासनाने येथील लोकलची संख्या तसेच डबे वाढवावेत, तसेच लांब अंतराचा प्रवास करणाºयांना मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत. येथील लोकल सेवा मुंबई प्रमाणे करून या मार्गावर दर ३० मिनिटाला एक लोकल सोडण्याची मागणीही रेल्वेकडे केली आहे.

डहाणू ते विरार दरम्यान अपघातांची संख्या वाढत चालली असल्याचेही जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१७ दरम्यान ६१३ प्रवाशांचा बळी गेल्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वसई विरारचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते राजकुमार चोरघे यांनी याबाबतीत मागितलेल्या माहितीद्वारे ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

1084
पुरु षांचा बळी

224
महिलांचा बळी

1,308
जणांचा विविध कारणांनी मागील
दहा वर्षात सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान बळी.

Web Title:  Dahanu-Virar: 613 victims in 5 years, crossing track, falling from door to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.