डहाणूत सहा महिन्यांपासून वैद्यकीय अधिक्षकच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 05:19 AM2018-12-17T05:19:39+5:302018-12-17T05:20:22+5:30

शोकांतिका : जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Dahanu has not been a medical superintendent for six months | डहाणूत सहा महिन्यांपासून वैद्यकीय अधिक्षकच नाही

डहाणूत सहा महिन्यांपासून वैद्यकीय अधिक्षकच नाही

googlenewsNext

डहाणू : गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचा आधार असलेल्या डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात गेल्या सहा, सात, महिन्यांपासून वैद्यकीय अधिक्षक नसल्याने शिवाय चार डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने येथे येणाऱ्या शेकडो रूग्णांची प्रचंड गैरसोय होत असून या बाबत अनेक वेळा तक्रार करून देखील जिल्हा आरोग्य विभाग गांभिर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या डहाणूत उपजिल्हयाचा दर्जा असलेले रूग्णालय आहे. शंभर खाटांच्या या रूग्णालयात डहाणू तालुका व परिसरातील दररोज सुमारे दोनशे बाहयरूग्ण येत असतात. शिवाय रात्री बेरात्री घात अपघातांचे गंभीर जखमी झालेले रूग्ण तसेच गरोदर महिला प्रसूतीसाठी मोठया संख्येने येथे येत असतात. परंतु रक्तपेढी सोनोग्राफी, एम.आर. आय., सीटीस्कॅन, बरोबरच अनेक सोयी सुविधा नसल्याने रूग्णांना इतर शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे जवळ असलेल्या गुजरात राज्यातील रूग्णालयात रुग्णांना पुढील उपचारासाठी न्यावे लागते.
डहाणू तालुक्यात नऊ प्राथमिक अरोग्यकेंद्रे तसेच शंभरपेक्षा उपकेंद्र आहेत. तर कासा येथे उपजिल्हा रूग्णालय असून वाणगांव येथे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु या सर्व ठिकाणी रूग्णलयाची प्रशस्त इमारत असली तरी अत्याधुनिक मशीन्स तसेच औषधांचा तुटवडा असल्याने येणाºया रूग्णांचे हाल होत असतात. दुर्गम भागांतून येणाºया दारिद्र्य रेषेखालील रूग्णांना तर कर्ज, उसनवारीने पैसे उभे करावे लागतात. अनेक औषधे रक्त तसेच सोनोग्राफी, सीटी स्कॅन खाजगी रूग्णालयातून करावे लागत असल्याने असंख्य रूग्ण तर उपजिल्हा रूग्णालयाऐवजी गुजरात येथील सेवाभावी रूग्णालयात उपचार घेत असतात. दरम्यान डहणूच्या उपजिल्हा रूग्णालयात चार डॉक्टरांची बदली, प्रमोशन झाल्याने नवे वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिक्षक नसल्याने शासकीय कामकाजांसाठी तसेच योग्य निर्णय घेण्यासाठी विलंब होत आहे.

आरोग्य विभाग उदासीन
उपजिल्हा रूग्णालयाबाबत पालघरचे आमदार अमित घोडा यांनी वारंवार जिल्हा आरोग्य विभागाला लेखी पत्र देऊन येथील रूग्णांना सोयी, सुविधा अपुºया असल्याची तक्रार केली आहे.

Web Title: Dahanu has not been a medical superintendent for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.