डहाणूतील शेतकऱ्यांचा संकरीत बियाणे खरेदीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:23 AM2018-06-07T01:23:30+5:302018-06-07T01:23:30+5:30

मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे.

 Dahanu farmers buy hybrid seeds yesterday | डहाणूतील शेतकऱ्यांचा संकरीत बियाणे खरेदीकडे कल

डहाणूतील शेतकऱ्यांचा संकरीत बियाणे खरेदीकडे कल

Next

बोर्डी : मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे. दरम्यान संकरीत बियाण्यांच्या खरेदीतील फसवणुकीचा धोका टाळण्याकरिता योग्य मार्गदर्शनाची गरज व्यक्त होत आहे.
कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ विभाग पडतात. त्यापैकी कोकण विभागामध्ये तीन विभाग येतात. कोकणाचे शेती व पीकपद्धती ठरविण्यामध्ये समुद्रकिनाºयापासूनचे अंतरसुद्धा महत्वाचे आहे. त्यानुसार किनाºयापासून १५ ते २० किमी खलाटी, २० ते ६० किमी वलाटी आणि त्यानंतर घाटमाथा असे हे तीन प्रकार आहेत. डहाणू तालुक्याला ३५ किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली असून, तालुक्याचा समावेश प्रामुख्याने खलाटी आणि वलाटी क्षेत्रात होतो. तालुक्यात खरीप हंगामात १५००० हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. त्यामध्ये हळवे २५५४, निमगरवे ९९०६ आणि गरवे २५४० हेक्टर असे लागवड क्षेत्र आहे. डहाणू तालुका पंचायत समितीअंतर्गत कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर फक्त कर्जत ७ या ११५ ते १२० दिवसाच्या कालावधीच्या भात बियाण्यांचे वाटप केले जाते आहे. या हंगामात २०० क्विंटल साठा कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. २० किलोच्या पोत्याची किंमत ८५९ रु पये आहे. मात्र सवलतीच्या दरात ४२५ रु पये आकारले जातात. या करिता लाभार्थी शेतकºयांकडे ७/१२ उतारा आवश्यक आहे. जास्तीतजास्त शेतकºयांनी या बियाण्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जमिनीच्या प्रकारानुसार भात वाणाच्या अन्य जातींचे पर्याय उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. मात्र ते उपलब्ध नसल्याने किमती अधिक असूनही संकरीत बियाणांकडे शेतकरी वळला आहे.

बिल जपा पिशवी उघडा टॅगच्या विरुद्ध दिशेने, उगवण कमी तर करा तक्रार
भात बियाणे खरेदी केल्यानंतर तसेच पेरणीपूर्वी शेतकºयांनी योग्यती खबरदारी घेतल्यास सदोष बियाण्यांच्या फसवणुकीचा धोका टाळता येतो. त्यानुसार बियाण्यांची पिशवी टॅगच्या विरूद्ध दिशेने फोडावी, बियाण्यांचा नमुना पिशवीत राखून ठेवावा, बिलाची सत्यप्रत जपून ठेवावी, साधारणत: ५ ते ७ दिवसात बियाणे उगवते. मात्र उगवण क्षमता कमी आढळल्यास खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्याची तपासणी पंचायत समितीच्या सक्षम अधिकाºयास करण्यास सांगावे. बियाण्यांची उगवण क्षमता कमी आढळल्यास बियाणे कायदा १९६६ कलम १९ नुसार कारवाई होऊ शकते. तालुकास्तरावर बियाणे तक्र ार समतिी गठीत केलेली असते. त्यासाठी शेतकºयांनी बियाणे खरेदी केल्यानंतर, पेरणीपूर्व तसेच पीक तयार झाल्यानंतर योग्य व अभ्यासपूर्ण निरीक्षण व नोंदी ठेवणे गरजेचे आहे.

Web Title:  Dahanu farmers buy hybrid seeds yesterday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.