तरखडच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये पडली फूट; काँग्रेस आघाडी संपुष्टात, बविआचे दोन सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 02:09 AM2017-09-24T02:09:30+5:302017-09-24T02:09:44+5:30

तरखड व आक्टण ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडली असून एका गटाने शिवसेना आणि जनआंदोलनाची कास धरली आहे. त्यामुळे अधिकृत काँग्रेसला फक्त तीनच जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत.

Congress split in subdivision polls; Due to the Congress alliance, the two members of the BWI are unconstitutional | तरखडच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये पडली फूट; काँग्रेस आघाडी संपुष्टात, बविआचे दोन सदस्य बिनविरोध

तरखडच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये पडली फूट; काँग्रेस आघाडी संपुष्टात, बविआचे दोन सदस्य बिनविरोध

Next

- शशी करपे ।
तरखड व आक्टण ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडली असून एका गटाने शिवसेना आणि जनआंदोलनाची कास धरली आहे. त्यामुळे अधिकृत काँग्रेसला फक्त तीनच जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत. या गोंधळात सत्ताधारी जनआंदोलन समिती आणि कांँग्रेस आघाडी संपुष्टात आली असून बहुजन विकास आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांना धक्का बसला आहे.
तरखड व आॅक्टण ग्रामपंचायतीच्या ९ पैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने सात जागांसाठी येत्या २६ सप्टेंबरला निवडणुका होत आहेत. बहुजन विकास आघाडीने दोन जागा बिनविरोध जिंकून बाजी मारली असतानाच काँग्रेसची मात्र अडचण झाली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव बिपीन कुटीन्हो यांनी जनआंदोलन समिती व शिवसेनेशी हातमिळवणी करीत स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. या पॅनलने सरपंचासह सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. कुटीन्हो यांनी कांँग्रेसी असलेल्यांनाच निवडणुकीत उतरवले आहे. विशेष म्हणजे सध्या प्रचारात स्व. मायकल फुर्ट्याडो यांच्या फोटोचाही त्यांनी वापर केला आहे. तसेच काँग्रेस जनआंदोलन व शिवसेना पुरस्कृत उमेदवार असाच प्रचार त्यांनी सुरु ठेवला आहे.
दुसरीकडे, कुटीन्हो यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने काँग्रेसला फक्त तीनच जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत. काँग्रेसनेही आपल्या प्रचारात स्व. मायकल फुर्ट्याडो यांच्या फोटोचा वापर केला आहे. दोन्ही गट कांँग्रेसच्या नावावरच मते मागत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते.
दरम्यान, मावळत्या ग्रामपंचायतीत काँग्रेस आणि जनआंदोलन युतीची सत्ता आहे. मात्र, अधिकृत काँग्रेस स्वतंत्र निवडणुक लढवत आहे. कुटीन्हो गट काँग्रेस पुरस्कृत असल्याचा दावा करीत असला तरी काँग्रेसने अधिकृतपणे तीन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी जनआंदोलन आणि काँग्रेस आघाडी संपुष्टात आली आहे. काँग्रेसच्या दोन्ही गटाचे उमेदवार आमने सामने उभे राहिले आहेत. या गोंधळाचा फायदा मात्र बहुजन विकास आघाडीला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण आघाडीचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

कुटीन्हो यांनी वरिष्ठांना विश्वासात न घेता स्वत:चे पॅनल उभे केले आहे. त्यांचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुक लढवीत असून उमेदवार उभे केले आहेत. जनआंदोलन, शिवसेना आणि कांँग्रेसची युती झालेली नाही. मतदारांची दिशाभूल करीत असलेल्या कुटीन्हो यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असून बंडखोरांवर कारवाई केली जाईल.
- किरण शिंदे,
वसई विरार जिल्हा मिडीया प्रमुख

Web Title: Congress split in subdivision polls; Due to the Congress alliance, the two members of the BWI are unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.