स्त्रियांवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ मोखाड्यात काँग्रेस पक्षाचा कँडल मार्च     

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 12:21 AM2018-04-16T00:21:29+5:302018-04-16T00:21:29+5:30

जम्मू- काश्मीर मधील  कथुआ व उत्तर प्रदेशातील  उनाव येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ  रविवारी संध्याकाळी 7:00 वाजता मोखाडा शहरातून   काँग्रेस आय पक्ष्याच्या शहर कमिटीच्या वतीने  तहसील कार्यालया पर्यंत कँडल मार्च काढून निषेध करण्यात आला.

Congress party's congress march in Mokhada protesting against atrocities on women | स्त्रियांवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ मोखाड्यात काँग्रेस पक्षाचा कँडल मार्च     

स्त्रियांवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ मोखाड्यात काँग्रेस पक्षाचा कँडल मार्च     

Next

मोखाडा -  जमू काश्मीर मधील  कथुआ व उत्तर प्रदेशातील  उनाव येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ  रविवारी संध्याकाळी 7:00 वाजता मोखाडा शहरातून   काँग्रेस आय पक्ष्याच्या शहर कमिटीच्या वतीने  तहसील कार्यालया पर्यंत कँडल मार्च काढून निषेध करण्यात आला  शहर कमिटीच्या वतीने मोठ्या संख्येने सर्वच समाज बांधवांनी  उपस्थित रहाण्याचे आव्हान केले होते या भावनिक आव्हाना ला दाद  देत या क्रूर घटनेचा निषेध करण्यासाठी बहुसंख्येने मुस्लिम  बांधवासह बहुजन बांधव उपस्थित होते.  यावेळी काँग्रेस पक्ष्याचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार यांनी  आपल्या भाषणात अश्या  मानवतेला काळ फासणाऱ्या या प्रवृत्तीचा व त्याला खतपाणी घालणाऱ्याचा चांगलाच खरपूच समाचार घेऊन  या घटनेचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली.    
दोन्ही घटनेतील केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा व्यात  सहा महिन्याचा आता ह्या गुन्हेगारांना  फाशीची शिक्षा देण्यात यावी महिलांवरील वाढते अत्याचार रोखावेत आदी मागण्या  मोखाडा तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आरिफ भाई मणियार शहर अध्यक्ष जमशिद( लारा)शेख  युवा नेते सदाम शेख नगरसेविका  फिरदोस  जमशीद शेख  वामन दिघा आदी कार्यकर्ते  व महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Congress party's congress march in Mokhada protesting against atrocities on women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या