विरारमध्ये रंगला सामुदायिक विवाहसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:36 PM2018-12-13T22:36:42+5:302018-12-13T22:36:56+5:30

जीवदानी देवी संस्थानाकडून पुढाकार; ७० जोडप्यांना भावी जिवनासाठी दिल्या शुभेच्छा

Color Weddings in Virar | विरारमध्ये रंगला सामुदायिक विवाहसोहळा

विरारमध्ये रंगला सामुदायिक विवाहसोहळा

Next

वसई : विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानाच्यावतीने गुरूवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७० जोडप्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून भावी जिवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय ठाणे यांच्या सहकार्याने या सामूदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यात वसईतील २५,तलासरी ३३,विक्र मगड व जव्हार येथील १० आदिवासी समाजातील जोडप्यांचा समावेश होता.तसेच यातील १२ जोडपी इतर समाजातील होती. जिल्हातील गरीब शेतकऱ्यांना आपल्या मूला- मुलींची लग्ने खर्चाची गोळाबेरीज बसविण्यासाठी कधी कर्ज तर कधी जमीन गहाण ठेवून व्यवस्था करावी लागते. अनेकदा कर्जापोटी शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून त्यांच्या विवाहयोग्य मूला-मूलींचे सामूहिक विवाह लावण्यासाठी धर्मदाय संस्थांच्या आवाहनानुसार हा पुढाकार घेण्यात आला होता. नवदांपत्यांना आशिर्वाद देण्यासाठी ठाणे धर्मादाय आयुक्त अशोक चुरी, वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर, शिवसेना डोंबिवलीचे आमदार सुभाष भोईर, नालासोपाºयाचे आमदार क्षितीज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, जीवदानी देवी ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र गावड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथ पाटील, वसईचे तहसीलदार किरण सुरवसे आदि मान्यवर उपस्थित होते.

नवदांपत्यांना दिले आहेर
सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांना संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या. त्यात वधूला १ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, वधु-वरांना कपडे, संसार उपयोगी भांडी व देवघरातील निरांजन आदि वस्तू देण्यात आल्या.

हा उपक्रम ट्रस्ट दरवर्षी राबविणार आहे. एखादी संस्था अगर वैयिक्तक लग्न सोहळ्यासाठी गडा खाली असणारे ट्रस्टचे मंगल कार्यालय अल्पदरात उपलब्ध करून दिले जाईल.
- पंकज ठाकूर, उपाध्यक्ष, जिवदानी ट्रस्ट

Web Title: Color Weddings in Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.