मारकुट्या शिक्षकाला दिला बेदम चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 12:48am

नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण करून त्याचा गळा दाबणाºया मारकुट्या शिक्षकाला विरारच्या रस्त्यात बेदम चोप देऊ़न पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

वसई : नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण करून त्याचा गळा दाबणाºया मारकुट्या शिक्षकाला विरारच्या रस्त्यात बेदम चोप देऊ़न पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही घटना विरार पूर्वेकडील जयदीप विद्यामंदिर शाळेत घडली. शिक्षक दिनेश शिंदे यांनी नितीन शर्मा या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. संतापाच्याभरात त्याचा गळाही दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या श्वसन नलिकेला इजा झाली असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही माहिती पालकांना कळताच त्यांनी शिंदे याला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. यावेळी लोकांनीही त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी शिंदे विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती. यामुळे या शहरातील पालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित

महापौर मॅरेथॉनमध्ये करणसिंग, प्राजक्ता विजेते
चोरी टाळण्यासाठी छताला जाळ्या
अणू उर्जाकेंद्रावर आज शिवसेनेचा मोर्चा
पानेरी नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
विधीमंडळात आला होता तारांकीत प्रश्न, अहवाल तत्कालीन सीईओंकडे

वसई विरार कडून आणखी

महापौर मॅरेथॉनमध्ये करणसिंग, प्राजक्ता विजेते
चोरी टाळण्यासाठी छताला जाळ्या
अणू उर्जाकेंद्रावर आज शिवसेनेचा मोर्चा
पानेरी नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
विधीमंडळात आला होता तारांकीत प्रश्न, अहवाल तत्कालीन सीईओंकडे

आणखी वाचा