हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:18 AM2019-07-19T00:18:44+5:302019-07-19T00:18:51+5:30

वातावरणातील निरनिराळ्या वायूंची व त्यातील विषारी घटकांची २४ तास अचूक व वेगवान पद्धतीने माहितीच्या डेटा बरोबरच कुठल्या भागात वायू प्रदूषण जास्त प्रमाणात आहे

Checking the quality of air quality is closed | हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन बंद

हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन बंद

Next

बोईसर : वातावरणातील निरनिराळ्या वायूंची व त्यातील विषारी घटकांची २४ तास अचूक व वेगवान पद्धतीने माहितीच्या डेटा बरोबरच कुठल्या भागात वायू प्रदूषण जास्त प्रमाणात आहे याचे मोजमाप करण्यासाठी तारापूर एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरती तसेच अन्य दोन ठिकाणी सुरु केलेली स्टेशन मागील अडीच वर्षापासून बंद पडून अक्षरश: धूळ खात पडली आहे
तारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे. एस. डब्ल्यू. स्टील लि (जिंदाल स्टील) या कारखान्याने सप्टेंबर २००९ साली ३० मेगावॅट क्षमतेचे कोळशावर चालणारे थर्मल पॉवर स्टेशन सुरू केल्यानंतर हवा व ध्वनी प्रदूषणाची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊ लागल्याच्या तक्रारी म.प्र.नि. मंडळाकडे येताच मंडळाने प्रदूषण होऊ नये म्हणून काही उपाय योजना व सुधारणा सुचवून वातावरणातील हवेची गुणवत्ता तपासणारी तीन स्टेशन एमआयडीसीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इन्स्टॉल करण्याचे आदेश जे.एस.डब्ल्यू. स्टील या उद्योग समूहाला दिल्यानंतर २०१२ साली ३ स्टेशन सुरु करण्यात आली होती.
तारापूरला कोळसा व इंधनाच्या वापरा बरोबरच रासानिक कारखान्यातून बाहेर पडणारे वेगवेगळे धूर यामुळे वायू प्रदूषणाची प्रचंड समस्या असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारतीवरती वातावरणातील हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन फेब्रुवारी २०१७ पासून बंद पडले आहे. ते पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात या महिन्यात (जुलै २०१९) एक बैठक होऊन बंद पडलेली तिन्ही स्टेशन जे.एस.डब्ल्यू. स्टीलने पुन्हा सुरू करावीत, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते. मात्र सप्टेंबर २०१८ ला म.प्र.नि.मंडळाच्या ठाणे व पालघर विभागाचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी लाड यांचेशी संपर्क साधला होता. तेव्हा त्यांनी लवकरच बंद असलेली स्टेशन्स जे.एस.डब्ल्यू. स्टील किंवा एखाद्या उद्योगाच्या साहाय्याने पुन्हा सुरू करण्यात येतील आणि या दोन्ही माध्यमातून सुरू करण्यास यश न आल्यास म.प्र.नि.मंडळ चालवेल, असे लोकमतला सांगितले होते. त्यामुळे आता कागदी घोडे न नाचवता ठोस कृति करावी, अशी मागणी आहे.
>आता कोण चालविणार?
जेएसडब्ल्यू स्टीलचे थर्मल पॉवर स्टेशन बंद होताच हवेची गुणवत्ता तपासणारी स्टेशन झाली बंद. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता असा आहे की जे.एस.डब्ल्यू.स्टीलचे थर्मल पॉवर स्टेशन डिसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत गेले. त्यामुळे आता हवेची गुणवत्ता तपासणारी स्टेशन चालविण्याची जबाबदारी जबाबदारी म.प्र.नि.मंडळाने घेणे गरजेचे होते.
>हवा प्रदूषणाचे भीषण वास्तव
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगात दरवर्षी प्रदूषणाने सुमारे ७० लाख लोक अकाली मृत्यू पावतात. तारापूर मध्येही हवा प्रदूषण ही एक गंभीर समस्या असून लाखो नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचविते आहे. प्रदूषण स्टॅण्डर्ड पॅरामिटरच्या बाहेर कधी कधी गेले हे यावरून समजत होते.
>यामुळे होते प्रदूषण
कारखान्यांमधून बाहेर पडणारे घातक वायू , विविध रासायनिक कारखान्याचा धूर वाहनांच्या धुरामधील प्रदूषित वायू तर धूर, धूलिकण, धूळ किंवा इतर तरंगत राहणारे अतिसूक्ष्म कण. वाहनांच्या धुरातूनही हे कण बाहेर पडतात.
>जेएसडब्ल्यू स्टील या उद्योग समूहाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून दुरुस्तीही करून घेतली असून लवकरात लवकर ही स्टेशन्स कार्यान्वित करण्यात येईल.
- मनीष होळकर,
उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र
प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर १

Web Title: Checking the quality of air quality is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.