बोर्डी : डहाणू तालुक्यातून के.एल. पोंदा हायस्कूलचे शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांच्या उपक्रमाची निवड शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिक्षणाच्या वारीला शिक्षकांसह नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. नियमित शिक्षकांव्यतिरिक्त प्रयोगशील कृतीशील व हौशी शिक्षकासह २५ हजार शिक्षणप्रेमिंनी या वारीचा लाभ घेतला.
राज्यातील शिक्षकासोबतच, शिक्षणप्रेमी, पालक व सर्वसामान्य नागरिकांनाही या शिक्षणाच्या वारीचा आस्वाद घेता यावा यासाठी यावर्षी चार ठिकाणी वारी आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात लातूर येथे १७ ते १९ नोव्हेंबर, दुसºया टप्प्यात अमरावती येथे १५ ते १८ डिसेंबर, तिसºया टप्प्यात रत्नागिरी येथे ११ ते १३ जानेवारी मध्ये आणि चौथ्या टप्प्यात नाशिक येथे २९ ते ३१ जानेवारी मध्ये होईल. महाराष्ट्रात अनेक शिक्षक प्रयोगशील, कृतीशील आणि उपक्रमशील आहेत. त्यांचे उपक्रम फक्त त्यांच्यापुरतेच मर्यादित न राहता, त्याचा फायदा इतरांनाही व्हावा याच प्रमुख उद्देशाने शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षकांनी शाळेत, तालुक्यात, जिल्ह्यात राबविलेले नाविन्यपूर्ण ५० उपक्र मावर स्टॉल मांडण्यात येणार आहेत. डहाणू तालुक्यातून शिक्षक चव्हाण यांच्या ‘कमीतकमी इंग्रजी शब्द वापरून जास्तीतजास्त वाक्ये तयार करण्याच्या’ उपक्रमाची निवड झाली आहे. त्यांच्या या उपक्रमाची नोंद नवीन राष्ट्रीय विक्र म म्हणून इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये तर नवीन जागतिक विक्रम म्हणून जागतिक दर्जाचे गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. शिक्षणाची वारी २०१७-१८ मध्ये वरील चारही ठिकाणी त्यांना आपल्या उपक्रमाचा ५० पैकी एक स्टॉल मांडण्याची संधी मिळाली आहे. शिक्षणाची वारी या उपक्र मास प्रत्येक जिल्हातून २०० शिक्षक आणि ५० शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भेट देणार आहेत .


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.