बहुजन विकास आघाडीचा शहरी व ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:25 AM2019-04-26T00:25:10+5:302019-04-26T00:25:38+5:30

प्रत्येक घरात वीज दिल्याचा दावा करणाऱ्यांनी : मोखाडा, तलासरीत सर्वेक्षण करावे

Bullying Campaign in the urban and rural areas of Bahujan Vikas Alliance | बहुजन विकास आघाडीचा शहरी व ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात

बहुजन विकास आघाडीचा शहरी व ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात

Next

पालघर : बहुजन विकास आघाडीचे नेते आ.हितेंद्र ठाकूर व उमेदवार बळीराम जाधव या दोघांनी बुधवारी जिल्ह्याचा शहरी व ग्रामीण भाग पिंजून काढला. बळीराम जाधव यांनी मोखाडा, जव्हार, खोडाळा व विक्र मगड या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे ते भारावून गेले. यावेळी झालेल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले, हे सरकार गोरगरीबांचे नसून मूठभर उद्योगपतीसाठी राबणारे सरकार आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली असतांना, राज्य सरकार मात्र आपल्याच मस्तीत आहे. ग्रामीण भागात हजारो आदिवासी मुले कुपोषणांमुळे मरणाच्या दारात आहेत, परंतु सरकारला त्याची चाड नाही. गुरांना चारा नाही, आदिवासी शेतमजुरांच्या हाताला काम नाही, मनरेगा योजनेंतर्गत असलेली कामे बंद करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी २ ते ३ कि.मी. पायपीट करावी लागत आहे, अशी स्थिती असताना सरकार मात्र निद्रावस्थेत आहे. त्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे.

दुसरीकडे आ.हितेंद्र ठाकूर यांनी वसई,नालासोपारा व वसई गावात झालेल्या चौकसभेत सरकारच्या गैरकारभारावर चौफेर टीका केली.ते म्हणाले, अच्छे दिन राहिले दूर, पूर्वी होते ते दिवस राहिले म्हणजे आपण खूप काही मिळवल्यासारखे होईल, काँग्रेसच्या कारकिर्दीत सुरू झालेल्या योजनांची नावे बदलून स्वत:च्या नावावर खपवणारे हे सरकार आहे.

३५० चा सिलिंडर ८०० ला हे अच्छे दिन म्हणायचे का?
ही मंडळी मते मागायला आली की त्यांना जाब विचारा.गॅस सिलिंडर ३५० रु. होता तो आता ८०० रु . झाला. याला आपण अच्छे दिन म्हणायचे का ?
देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली, असा दावा करणार्या मोदी सरकारने मोखाडा भागात अंधारात चाचपडणाºया गावांचे सर्व्हेक्षण करावे.

Web Title: Bullying Campaign in the urban and rural areas of Bahujan Vikas Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.