जामशेत येथे पोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेन सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:33 AM2019-07-17T00:33:20+5:302019-07-17T00:33:25+5:30

जामशेत येथे काही भागात बुलेट ट्रेन सर्वेक्षण सुरू करून स्थानिकांचा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न बुलेट ट्रेन सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी केला.

Bullet train survey in police station at Jamtshet | जामशेत येथे पोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेन सर्वेक्षण

जामशेत येथे पोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेन सर्वेक्षण

Next

डहाणू : डहाणू तालुक्यात पोलीस बळाचा वापर करून जामशेत येथे काही भागात बुलेट ट्रेन सर्वेक्षण सुरू करून स्थानिकांचा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न बुलेट ट्रेन सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी केला. ८३ पैकी ७२ शेतकऱ्यांची या सर्वेक्षणाला संमती असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. यावेळी आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी रस्त्यावर उतरल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. जनसंपर्क अधिकारी सचिन तोडकर, वरिष्ठ व्यवस्थापक एन.डी.वाघ यांनी लोकांची समजूत काढली. तर घटनास्थळी १०० हून अधिक पोलीस हजर राहिल्याने छावणीचे स्वरु प प्राप्त झाले होेते.
बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार असल्याने जामशेत वसंतवाडी येथे पोलीस बंदोबस्त वाढू लागला. सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी कष्टकरी संघटनेच्या मधू धोडी, आदिवासी एकता परिषदेचे भरत वायडा, माकपच्या लहानी दौडा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जमा झाले. बहुसंख्य शेतकºयांनी जागा मोजणीबाबत संमती दिल्याने आम्ही येथे आलो आहोत. ज्या शेतकºयांनी यासाठी संमती दिलेली नाही. आम्ही त्यांची जागा मोजणी करणार नाही, असे वरिष्ठ व्यवस्थापक एन.डी.वाघ वरिष्ठ व्यवस्थापक यांनी सांगितले. ७२ शेतकºयांची जमीन मोजणीला संमती असल्याचे सांगून अधिकाºयांनी या शेतकºयांच्या जमीन सर्वेक्षणाचे काम सुरु ठेवले. दरम्यान, स्थानिकांनी इतर कुठेही सर्वेक्षण करु देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.
>जामशेत येथे ज्या शेतकºयांनी जमीन मोजणीस संमती दिली आहे. त्या शेतकºयांच्या जमीन मोजणी करणार आहोत. ज्या शेतकºयांनी संमती दिली नाही. त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करणार नाही.
-एन.डी.वाघ, सिनिअर मॅनेजर

Web Title: Bullet train survey in police station at Jamtshet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.