लाचखोर लिपिक आणि शिपायास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 10:36 PM2017-12-04T22:36:18+5:302017-12-04T22:36:46+5:30

पालघर ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक संतोष सुरवसे आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे शिपाई संजय माळी ह्यांना वैद्यकीय बिल मंजूर करण्या प्रकरणी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात अटक केली.

Bribery clerk and soldiers arrested | लाचखोर लिपिक आणि शिपायास अटक

लाचखोर लिपिक आणि शिपायास अटक

googlenewsNext

पालघर - पालघर ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक संतोष सुरवसे आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे शिपाई संजय माळी ह्यांना वैद्यकीय बिल मंजूर करण्या प्रकरणी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात अटक केली.

  जिल्ह्यातील वनविभागात काम करणाऱ्या एका 45 वर्षीय कर्मचाऱ्याने आपले वैद्यकीय बिल मंजूर करण्याचे प्रकरण पालघरच्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात दिले होते.मात्र हे बिल मंजूर करण्यासाठी आपल्याला 11 हजार रुपये द्यावे लागतील असे सुरवसे व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीला सांगितले.आपल्याला इतकी रक्कम देणे शक्य नसल्याचे फिर्यादिनी सांगूनही दोन्ही आरोपीनी पैश्याचा तगादा लावला होता.शेवटी कंटाळून फिर्यादिनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा चार दिवसांपूर्वी तक्रार केल्या नंतर पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात असलेल्या माळी ला प्रथम ताब्यात घेतले.त्यांनी आपल्याला सुरवसे ह्यांनी पैसे स्वीकारायला सांगितले.पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कलमान्वये अटक केल्याचे तापसी अधिकाऱ्यांनी सांगितले

      कनिष्ठ लिपिक सुरवसे ह्याच्या अनेक वर्षांपासून तक्रारी असून त्यांची पत्नी मुंबईच्या पोलीस विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असल्याने त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांशी ओळख असल्याने आपले कुणी वाकडे करू शकत नाही असे तो सांगित असल्याची चर्चा ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे.आरोपी कडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची चर्चा असून त्याचीही चौकशीची मागणी होत आहे.पालघरच्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात बिले मंजुरीसाठी पैश्याची सतत मागणी केली जात असल्याच्या तक्रारी ही करण्यात आल्या आहेत.

Web Title: Bribery clerk and soldiers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.