जमिनी बळकावणारे हात तोडून टाकू - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:25 AM2018-06-08T02:25:16+5:302018-06-08T02:25:16+5:30

बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस हायवे, फ्रेट कॅरिडोर या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी जबरदस्तीने बळकविणारे हात शिवसेना तोडून टाकेल अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथील सभेत केली.

 Break the hands of grabbing the land - Uddhav Thackeray | जमिनी बळकावणारे हात तोडून टाकू - उद्धव ठाकरे

जमिनी बळकावणारे हात तोडून टाकू - उद्धव ठाकरे

Next

वनगापाडा, तलासरी : बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस हायवे, फ्रेट कॅरिडोर या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी जबरदस्तीने बळकविणारे हात शिवसेना तोडून टाकेल अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथील सभेत केली. पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत तन-मन-धनाने शिवसेनेचे कार्य करणाऱ्या शिवसैनिक व पदाधिकारी यांना धन्यवाद देण्यासाठी येथे आयोजिलेल्या सभेत ते बोलत होते. बुलेट ट्रेनबाबत जी जनसुनावणी घेतली. ती मध्ये जर जनतेच्या भावनांचा आणि तिने मांडलेल्या मतांचा विचारच केला जाणार नसेल तर ती घ्यायची कशाला? संपूर्ण अहवाल इंग्रजीत तो ही कुणाच्या हाती नाही अशी स्थितीत त्याची माहिती जनतेला होणार कशी? त्याबाबतचे आक्षेप नोंदवणार तरी कसे असे सवाल त्यांनी केले.
१९९६ मध्ये युतीचे सरकार असतांना वाढवण बंदर उभारण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु या बंदराला भूमिपुत्रांचा प्रचंड विरोध होता. तेव्हा बाळासाहेबांनी वाढवणला जाऊन जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी मला पाठविले होते. पाहिजे तर आमच्यावर गोळ्या झाडा पण आम्हाला हे बंदर नको आम्ही ते होऊ देणार नाही. अशा त्यांच्या भावना त्या शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहचवल्या, तेव्हा त्यांनी ताबडतोब ते बंदर रद्द करायला लावले अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

बळी घेतल्याशिवाय सरकारला आंदोलकांच्या भावना कळत नाहीत
११ आंदोलक गोळीबारात ठार झाल्यानंतर तामिळनाडूमधील स्टरलाईट प्रकल्प रद्द केला गेला. लोकांचे रक्त सांडल्याशिवाय सरकारला त्यांच्या भावनांची तीव्रता कळत नाही काय? असाही सवाल त्यांनी केला. गुरुवारी झालेल्या अमित शहा यांच्यासमवेतच्या चर्चेबाबत ते काही बोलतील अथवा खुलासा करतील अशी सगळ्याच प्रचार माध्यमांची अपेक्षा होती. परंतु त्याबाबत त्यांनी मौन पाळून त्यांची निराशा केली. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे जिल्हासंपर्क प्रमुख विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक, पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राजेशभाई शहा आदी होते.

Web Title:  Break the hands of grabbing the land - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.