पालघर न.प.साठी कांटे की टक्कर, २६ जागांसाठी ९१ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:27 PM2019-03-14T23:27:25+5:302019-03-14T23:27:38+5:30

राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी; मतदारांना आकर्षित करण्याचे डावपेच सुरू

In the battle for the Palghar NP, for the first time in the fray for 9 seats for the 26 seats | पालघर न.प.साठी कांटे की टक्कर, २६ जागांसाठी ९१ उमेदवार रिंगणात

पालघर न.प.साठी कांटे की टक्कर, २६ जागांसाठी ९१ उमेदवार रिंगणात

Next

पालघर : पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षाची निवडणूक काटे की टक्कर ठरणार असून इतर २६ जागासाठी ९१ उमेदवार रिंगणात आहेत. तीन प्रभागात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने आज दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेतल्या नंतर शुक्र वारी यावर निर्णय होणार आहे.

प्रभाग क्र मांक १ मध्ये विलास काटेला (भाजप), भालचंद्र दांडेकर (काँग्रेस आघाडी), नितेश बसवत (अपक्ष) दिनेश बाबर (अपक्ष- शिवसेना बंडखोर), अशी चौरंगी लढत होणार आहे तर, १ ब मध्ये रु ंजी घुड े(शिवसेना), सुनीता भोईर(राष्ट्रवादी आघाडी), मनीषा काळपुंड(अपक्ष), शेरबानू मेमन (अपक्ष, बंडखोर) अशी चौरंगी लढत आहेत.

२ अ मध्ये प्रियांका म्हात्र े(शिवसेना), परवीन शेख (बविआआघाडी) यांच्यात दुहेरी लढत, २ ब रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे े(शिवसेना), इम्रान शेख (राष्ट्रवादी आघाडी), आरिफ कलाडिया (अपक्ष-बंडखोर), बिंदीया दक्षित (अपक्ष-बंडखोर), जावेद लुलानिया (अपक्ष), विकास सिह (अपक्ष) अशी सहा उमेदवारात लढत, 3अ मध्ये मोना मिश्रा(भाजप),कांता अधिकारी (बविआ आघाडी), योगिता धोडी (अपक्ष-बंडखोर), अशी तिहेरी लढत, ३ब मध्ये सुरज धोत्र े(राष्ट्रवादी आघाडी), तुषार भानुशाली (शिवसेना), मनोहर दांडेकर (अपक्ष), संजू धोत्रे (अपक्ष), महेश धोडी(अपक्ष), रामदयाल यादव (अपक्ष) असे ६ उमेदवार रिंगणात आहेत, ४अ मध्ये हेमा गडग (काँग्रेस), मनीषा लडे (भाजप युती), कविता जाधव (अपक्ष बंडखोर), यांच्यात तिरंगी लढत, ४ ब मध्ये कुश दुबे (काँग्रेस आघाडी), अमर द्विवेदी (शिवसेना), प्रवीण मोरे (अपक्ष बंडखोर) अशी तिहेरी लढत, ५अ मध्ये दिनेश घरट (सेना), स्वप्नाली जाधव (राष्ट्रवादी) अशी दुहेरी लढत, ५ब मध्ये गीतांजली पाटील (शिवसेना युती),हिंदवी पाटील (राष्ट्रवादी आघाडी) रेश्मा घरत (अपक्ष) अशी तिहेरी लढत, ६अ मध्ये शिवसेनेचे कैलास म्हात्रे हे बिनविरोध, ६ब मध्ये धृतिका पंड्या (राष्ट्रवादी आघाडी), लक्ष्मीदेवी हजारी (भाजप युती) सफिना रईस खान (अपक्ष बंडखोर) यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

७ अ मध्ये राजेंद्र पाटील (शिवसेना) अनिस शेख (बविआ) यांच्यात दुहेरी लढत होणार, ७ ब न्यायप्रविष्ठ, ८अ मध्ये चंद्रशेखर वडे (शिवसेना)संतोष चुरी(बविआ आघाडी), उत्तम पिंपळे (अपक्ष बंडखोर) यांच्यात तिहेरी लढत, ८ब मध्ये वंदना तिवारी (शिवसेना युती) शिल्पा बाजपेई (राष्ट्रवादी)यांच्यात दुहेरी लढत, ९अ मध्ये अनुजा तर े(शिवसेना) शालिनी मेमन (बविआ आघाडी) यांच्यात दुहेरी लढत, ९ ब न्यायप्रविष्ठ, १० अ मध्ये गीता पिंपळे या भाजपच्या उमेदवार बिनविरोध निवड, १०ब मध्ये निशांत धोत्रे(मनसे), सचिन पाटील (राष्ट्रवादी), अक्षय संखे (शिवसेना) अशी तिहेरी लढत, ११अ मध्ये कृतिका गवई (मनसे) , चेतना गायकवाड (शिवसेना युती), ऋषाली भोणे(राष्ट्रवादी),स्नेहल गायकवाड (अपक्ष बंडखोर), रु पाली शेलार (अपक्ष) अशी पंचरंगी लढत, ११ ब मध्ये विनय आघाव (मनसे), नंदकुमार पाटील (राष्ट्रवादी आघाडी), भावानंद संखे(भाजप युती),कैलास त्रिवेदी(माकप),सागर मौर्य(अपक्ष) यांच्यात पंचरंगी लढत होणार आहे.

१२अ दीपा पामाळे(राष्ट्रवादी आघाडी), राधा मानकामे (शिवसेना युती) अशी दुहेरी लढत, १२ब मध्ये न्यायप्रविष्ठ, १३अ मध्ये अनिता किणी (भाजप युती), दर्शना राऊत (राष्ट्रवादी आघाडी), गीता संखे (मनसे) अशी तिहेरी लढत, १३ ब मध्ये गौतम गायकवाड (राष्ट्रवादी आघाडी),अमोल पाटील (शिवसेना युती), अविनाश भोरे (मनसे), चंद्रकांत राऊत(अपक्ष),कृष्णा उपाध्याय (अपक्ष)अशी पंचरंगी लढत, १४अ मध्ये उत्तम घरत (शिवसेना युती), किरण पाटील (राष्ट्रवादी आघाडी), प्रतीक चौधरी (अपक्ष), परेश पाटील (अपक्ष बंडखोर),
अजित भुवड(अपक्ष), अशी पंचरंगी लढत, तर १४ ब मध्ये रोहिणी अंबुरे (भाजप युती), प्रफुल्ला परमार (राष्ट्रवादी आघाडी),नेहा शिंद े(अपक्ष बंडखोर) अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

आज येणाऱ्या निकालावर तिघांचे भवितव्य
नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्र मांक ७ ब, ९ ब व १२ ब प्रभागातील उमेदवारांनी पालघर सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिके संधर्भात आज न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणात उद्या (शुक्र वारी) न्यायालयात निर्णय अपेक्षित आहे. शिवसेना-भाजप ची युती असून, काँग्रेस-राष्ट्रवादी-बहुजन विकास आघाडी यांची आघाडी झाली आहे.

सेना बंडखोर म्हणून नगराध्यक्षसह अन्य ९ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून मनसे, जनता दल निवडणूक लढत आहे. सध्या २६ जागांसाठी ९१ उमेदवार नशीब आजमावणार असले तरी न्यायालायाच्या निकालानंतर या आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. दरम्यान, या निकालाचा परिणाम नगर परिषदेच्या एकुणच राजकीय गणितावर होणार आहे.

Web Title: In the battle for the Palghar NP, for the first time in the fray for 9 seats for the 26 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.