मीरारोडमध्ये 800 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 08:50 PM2018-05-30T20:50:29+5:302018-05-30T20:50:29+5:30

झोपड्या बांधण्यासाठीचे बहुतांश बांबू , पत्रे आदी पालिकेने जप्त केले आहेत.

Anti encroachment action in Mira road | मीरारोडमध्ये 800 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

मीरारोडमध्ये 800 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

मीरारोड - माशाचा पाडा भागातील सुमारे 11 एकर क्षेत्रातील आदिवासी जमिनीवर बांधण्यात आलेल्या 800 झोपड्या महापालिकेने बुधवारी तोडल्या. वन विभागाच्या हद्दी लगत झालेल्या ह्या झोपड्या ना विकास क्षेत्रात आहेत. 

काशिमीरा , चेणे - काजुपाडा आदी भागातील आदिवासींच्या मालकीच्या तसेच नाविकास क्षेत्रातील जमिनीं ध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा झोपड्या व बांधकामांचे पेव फुटले आहेत . या भागात दुसरी धारावी झोपडपट्टी उभी रहात असून स्थानिक आजी - माजी नगरसेवकांसह पालिका प्रशासनावर याचा ठपका ठेवला जात आहे .  

आज बुधवारी दुपारी महापालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर व अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांच्या निर्देशानुसार उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे , विभागप्रमुख संजय दोंदे , प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे ,  सुदाम गोडसे, गोविंद परब,  सुनिल यादव, नरेंद्र चव्हाण सह  प्रपालिका कर्मचारी , बाउन्सर आदींनी माशाचा पाडा मार्गावरील बेकायदा झोपडपट्टी वर कारवाईला सुरवात केली .  2 पोकलेन व 5 जेसीबी च्या सहाय्याने येथील 800 झोपड्यांवर कारवाई करण्यात आल्याचे महापलिकेने म्हटले आहे .  कारवाई वेळी येथील रहिवाशांकडे गॅस सिलेंडर आढळून आले . तर वीज पुरवठा देखील दुसरीकडून बेकायदा घेण्यात आला होता . 

महापालिका येथे टँकरने पाणी पुरवत होती . शिवाय बोअर मारण्यात आल्या होत्या . या झोपड्यांना भूमाफियांसह काही नगरसेवकांचा आशीर्वाद असल्याचे आरोप सतत होत आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये काही झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती.  या बेकायदा झोपडी धारकांवर पालिकेने गुन्हा दाखल करण्यास मात्र टाळाटाळ चालविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .  

कारवाईला विरोध होण्याची शक्यता पाहता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे व 33 पोलीस अधिकारी , 190  पुरुष पोलीस तर 75 महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते . दुपारी पावणेबाराच्या दरम्यान सुरु केलेली कारवाई सायंकाळी संपली . पालिकेने अग्निशमन दलाचे जवान देखील अग्निशामक यंत्रणेसह उपस्थित होते . 

झोपड्या कोणाकडून घेतल्या हे कोणी सांगत नाही. झोपड्या बांधण्यासाठीचे बहुतांश बांबू , पत्रे आदी पालिकेने जप्त केले आहेत. वीज पुरवठा करणाऱ्यां विरोधात कारवाई करण्यासाठी वीज कंपनीस सांगणार आहोत . त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर प्रकरणी देखील कंपनीला कळवले जाईल . जेणेकरून पुन्हा झोपड्या होणार नाहीत, याची खबरदारी घेऊ असे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे म्हणाले.

Web Title: Anti encroachment action in Mira road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.