विक्रमगडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:43 AM2017-11-21T02:43:17+5:302017-11-21T02:43:19+5:30

विक्रमगड : तालुक्याचे नाव केवळ विक्रमगड मात्र येथील नागरीक वर्षानुवर्षे समस्या सहन करण्याचा विक्रम करीत असतात़

Anecdotes on law and order in Vikramgad | विक्रमगडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

विक्रमगडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

googlenewsNext

राहुल वाडेकर
विक्रमगड : तालुक्याचे नाव केवळ विक्रमगड मात्र येथील नागरीक वर्षानुवर्षे समस्या सहन करण्याचा विक्रम करीत असतात़ तालुक्याचा विक्रम म्हणजे कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी अपुºया मनुष्य बळामुळे पोलिसांचीच दमछाक होते आहे.
तालुक्यात पोलिस कार्यालय एक असून, त्याची रचना विचित्र आहे. कारण तालुक्यातील काही गावे विक्रमगड तालुक्यात येतात तर पोलिस कार्यालय मनोर, कासा, जव्हार अशा दुस-या तालुक्यात़ त्यातही विक्रमगडच्या पोलिस कार्यालयात तालुक्याच्या मानाने पोलिसांची संख्या अत्यंत कमी असून, ६० गावांच्या व १२० पाडयांच्या कार्यक्षेत्रासाठी अवघे ४० पोलीस आहेत. तर पोलिसांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करणाºया पोलिस पाटलांचीही अनेक गावातील पदेही रिक्त आहे.
विक्रमगड तालुका हा आदिवासी बहुल असल्याने तसेच विक्रमगड पोलिस हद्दीतील ६० गावे १२० पाडयांस सुरक्षा पुरवितांना अपुºया पोलिसांमुळे कार्यरत असलेल्या पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडून त्यांची तारांबळ उडते आहे़ येथे पोलिस अधिकारी म्हणून विजय शिंदे यांची दुसºयांदा या पदी नियुक्ती करण्यात आली आहे़ मध्यतरी त्यांची बदली बोईसर येथे झाली होती़ तर एपीआय म्हणून विश्वास पाटील हे काम पाहत आहे़ या पोलिस ठाण्यात ४० पोलिस कर्मचारी, त्यामध्ये ८ महिलांचा कर्म-यांचा समावेश आहे़ या ४० कर्मचाºयांतच दोन अधिकाºयांचाही समावेश आहे. असे अपुरे संख्याबळ असल्याने ६० गावे व १२० पाडे व दिड लाखाच्या घरात लोकसंख्या असल्याने कायदा सुव्यवस्था राखायची कशी? असा प्रश्न पोलिसांना पडतो. त्यातच संघटनांची आंदोलने, राजकिय पक्षांचे मोर्चे याची भर पडत असते.
तालुक्याच्या मानाने सद्यस्थितीच्या परिस्थितीनुसार ६० पोलिस कर्मचारी एक पोलिस निरीक्षक, एक ए़ पी़ आय़, चार पोलिस उपनिरीक्षक अशी पदे असणे आवश्यक आहे़ ब्रिटीश काळापासून विक्रमगड पोलिस कार्यालयात कर्मचारी व अधिकारी भरती केली नसल्याने सद्यस्थितीत विक्रमगड पोलिस कार्यालयात ६० गावांच्या व १२० पाडयांच्या सुरक्षेतेसाठी फक्त ४० कर्मचारी आहेत़ त्यामुळे पोलिसांना अतिरिक्त कामाचा ताण,बंदोबस्त, दिवस रात्रीची गस्त, वारंट बजावणे,कोर्टात जाणे, पेट्रोलिंग करणे, किरकोळ भांडणे सोडविणे अपघात या कामांच्या ताणामुळे व अपु-या पोलिस बळामुळे विक्रमगड व परिसरा आसपास असणा-या गाव खेडया पाडयांचा सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे़
पोलिस पाटील हा गावकºयांसाठी भांडणे, तंटे स्थानिक पातळीवर मिटविणारा व पोलिसांना गाव-पाडयातील माहिती देणारा महत्वाचा दुआ आहे़ त्यामुळे प्रत्येक गावात-पाडयांसाठी स्वतंत्र पोलिस पाटलांची आवश्यकता आहे़
विक्रमगड पोलिस कार्यक्षेत्रात तालुक्यातील ६० गावांचा समावेश असुन, त्यातील बहुसंख्य पदे रिक्तच आहे़ त्यामुळे एकेका पोलिस पाटलाला दोन-तीन गावांची जबाबदारी पार पाडावी लागते़
>पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्डही उपेक्षित
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असलेले व प्रत्येक कार्यक्रमांच्या वेळी व निवडणूक, नवरात्र, गणपती आदीसांठी होमगार्ड पोलिसांप्रमाणेच चोख सुरक्षेसाठी बंदोबस्तांत महत्वाची भूमिका बजावित असतांत परंतु ते ही आजही उपेक्षित आहेत़ या दलाच्या अनेक मागण्या प्रलंबित असुन, शासनदरबारी त्यांची नोंद घेतली जात नसल्याच्या त्यांच्याही तक्रारी आहेत़
>विक्रमगडमधील वाहतूक नियंत्रण
डहाणू-वाडा-मनोर या महामार्गावरुन विक्रमगडमधून मुख्य बाजारातून मोठया प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरु असून, त्यामुळे सकाळी व सायंकाळी या मार्गावरील गडदे येथील तांबाडी पूल व अन्य पूलावर वाहतुककोंडी होते आहे. हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे़ त्यामुळे बारीक सारिक अपघातांमध्ये वाढ होत आहे़
>एक दिवसाच्या जनतादरबाराची गरज
विक्रमगड पोलिस कार्यालयात वरिष्ठ अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली थेट जनतेशी व जनतेचा पोलिसांची संपर्क येवून घडलेल्या घडामोडींचा व वाद, विवाद कसे टाळावे तंटे गावातच कशा प्रकारे मिटवावेत यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जनता दरबाराची आवश्यकता आहे़ गावपातळीवर तंटामुक्ती समित्या नेमण्यांत आलेल्या आहेत़ तक्रार निवारणासाठी शुक्रवार होता मात्र त्यात सातत्य नाही़

Web Title: Anecdotes on law and order in Vikramgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.