आंदोलन फोडण्यास अमूलचा वापर सहन करणार नाही - शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:17 AM2018-07-17T04:17:35+5:302018-07-17T04:17:37+5:30

अमूलने महाराष्ट्रात यावे निरोगी स्पर्धा करावी त्याला विरोध नाही

Amul will not tolerate the use of Amul to break the agitation - Shetty | आंदोलन फोडण्यास अमूलचा वापर सहन करणार नाही - शेट्टी

आंदोलन फोडण्यास अमूलचा वापर सहन करणार नाही - शेट्टी

Next

बोईसर : अमूलने महाराष्ट्रात यावे निरोगी स्पर्धा करावी त्याला विरोध नाही, पण महाराष्ट्रातील दूध उत्पादकांचे आंदोलन फोडण्यासाठी अमूलचा वापर करण्याचे कारस्थान सहन केले जाणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी तारापूर येथे केलेल्या आंदोलनादरम्यान राज्य सरकारला दिला.
बोईसर येथे वसुंधरा डेअरीसमोर त्यांनी निदर्शने केली. यावेळी आमदार कपील पाटील, भूमिसेना नेते काळूराम धोदडे हे सहभागी झाले होते. शेतकरी संघटना संपवण्याचे काम सरकारमध्ये सहभागी असलेली संघटनेची मंडळी करीत आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला. सरकारकडून दूध उत्पादकांची व नेत्यांची धरपकड करत आहे, कारण दूध माफियांशी सरकारचे साटेलोटे आहे. ते संपवले पाहिजे. मी सरकारसोबत चर्चेस तयार असतो. परंतु या सरकारवर भरवसाच उरला नाही, त्यामुळे तूर्तास सरकारसोबत चर्चा नाही असे ते म्हणाले.

Web Title: Amul will not tolerate the use of Amul to break the agitation - Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.