पाणेरी बचाने की जंग में हम सब संग में - जलपुरूष राजेंद्र सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 12:26 AM2019-03-27T00:26:37+5:302019-03-27T00:28:03+5:30

आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.

 All of us in the battle of saving the water in Paneri - Jalpur Rajendra Singh | पाणेरी बचाने की जंग में हम सब संग में - जलपुरूष राजेंद्र सिंग

पाणेरी बचाने की जंग में हम सब संग में - जलपुरूष राजेंद्र सिंग

Next

पालघर : आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला वारसा म्हणून शुद्ध पाण्याची तरतूद करणे हेच आपले मुख्य कर्तव्य आहे या शब्दात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ जलपुरु ष डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी पाण्याचे महत्त्व विशद केले.
पाणेरी नदी प्रदूषणाविरुद्ध माहीमवासींनी सुरू केलेल्या चळवळीच्या अनुषंगाने सोमवारी आयोजित एका जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. सकाळी पाणेरी नदीच्या उगमापासून शेवटपर्यंतच्या भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर दुपारच्या जाहीर व्याख्यान्यात त्यांनी पानेरी नदीच्या पुनर्जीवितासंबंधी व एकंदर पाणी प्रश्नावर उपस्थितांना संबोधित केले.
पाणेरी नदीची स्थिती अत्यंत खराब असून नदीवर होत असलेला अन्याय हा समाजावरील अन्याय म्हणायला हवा कारण नदीच्या आरोग्याशी आपले आरोग्य निगिडत असल्याने नदी आजारी पडल्यास आपणही आजारी पडतो हे सांगताना डॉ. सिंह यांनी गंगा नदीच्या प्रदूषणाचा दाखला दिला. गंगा प्रदूषणामुळे कानपूर ते कनोजपर्यंतच्या भागात भारतातील सर्वाधिक कर्करोग रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा खोटा अहवाल देते. म्हणून सरकारमान्य खाजगी प्रयोगशाळांच्या सहकार्याने नदीतील पाण्याचे नमुने तपासणी करून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला उघडे पाहायला हवे असे आवाहनही डॉ. सिंह यांनी केले. पाणेरी नदीच्या प्रदूषणाविरु द्धच्या आंदोलनात काही प्रमुख मुद्यावर त्यांनी विशेष भर दिला त्यानुसार पाणेरी नदीचे शासन दप्तरी योग्य नामकरण करणे गरजेचे असून पानेरी खाडी असा चुकीच्या उल्लेखात सुधारणा करून ‘पाणेरी नदी’ हा बदल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अधिकार वापरून करावा. यासाठी ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देणे, पाणेरी नदीची श्वेतिपत्रका तयार करून नदी कोणामुळे, कधीपासून आणि कुठपासून आजारी आहे याची माहिती सर्वांना करून देणे तसेच जिल्हाधिकाऱ्यांंना नदीची ओळख तिचे सीमांकन आणि चिन्हांकन करून घ्यायला भाग पाडणे या मुद्द्यांवर सर्वप्रथम काम करायला हवे असे सांगितले. तसेच नदीवरील अतिक्र मण, प्रदूषण आणि शोषण या तीन संकटांपासून नदीचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title:  All of us in the battle of saving the water in Paneri - Jalpur Rajendra Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर