सर्व पक्षांना बंडखोरीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:42 PM2019-02-28T23:42:03+5:302019-02-28T23:42:15+5:30

पालघरचे राजकीय समीकरण बिघडले : निष्ठावंत, बंडखोर अपक्ष लढण्याच्या तयारीत

All parties rebel rebellion | सर्व पक्षांना बंडखोरीचा फटका

सर्व पक्षांना बंडखोरीचा फटका

Next

पालघर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचा सपाटा सुरु झाल्याने २८ नगरसेवकांच्या जागांचे गणित बिघडणार आहे. याचा निष्ठावंत शिवसैनिकात संतप्त असून अनेकांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार अर्ज भरण्याची तयारी चालवली आहे. त्यातच युती झाल्यास जागा वाटपाचे गणितही कोलमडण्याच्या उंबरठ्यावर उभे राहणार असल्याने भाजपकडून २८ उमेदवार तयारीत आहेत.


राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेले गटनेते, नगरसेवक मकरंद पाटील, त्यांच्या पत्नी नगरसेविका डॉ. श्वेता पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका बिंदीया दीक्षित, रेश्मा म्हात्रे, प्रविण मोरे हे पाच नगरसेवक गुरु वारी रात्रौ सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असून शिवसेने कडून नगराध्यक्षाची उमेदवार म्हणून डॉ. श्वेता पाटील यांच्या नावाची घोषणा आणि त्या अन्य नगरसेवकांना सेनेकडून पुन्हा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.


या बातमी मुळे स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या मध्ये संतप्त भाव उमटत असून राष्ट्रवादीच्या ५ विद्यमान नगरसेवकासह राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शहर प्रमुख अस्लम मणियार, माजी नगरसेवक रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे, राजू पाटील, अमोल पाटील या पाच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेताना त्यांना नगरसेवक पदाचे तिकीट देण्याच्या अटीवरच घेतले गेले असल्याने निष्ठावान शिवसैनिक आणि उपरे असा वाद निर्माण होणार आहे.
विद्यमान नगरपरिषदेत २८ पैकी १७ नगरसेवक शिवसेनेचे असून हे सर्व निष्ठावंत आहेत. त्यांनी पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागितली असून अन्य पक्षातून आयात केलेल्या १० लोकांना कसे सामावून घेणार हा पेच आहे. त्यातच युती झाल्यास भाजप ने निम्म्या जागांवर आपला अधिकार
मागितला असल्याने, मित्रपक्ष आरपीआयला एक-दोन जागा सोडणे गरजेचे असल्याने २८ जागांच्या उमेदवारीचे वाटप कसे करणार असा हा प्रश्न आहे.

शिवसेनेचे नगरसेवक गुरुवारी मातोश्रीवर गेल्याने दबावतंत्र
मकरंद पाटील आणि डॉ. श्वेता पाटील सह अन्य नगरसेवकांना सेनेत घेण्यास स्थानिक शिवसैनिक, पदाधिकाºयाचा प्रचंड मोठा विरोध आहे. मकरंद पाटील आणि त्यांच्यासह अन्य बाहेरच्या पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घ्यायची गरजच काय? असा प्रश्न शिवसैनिका मधून उपस्थित केला जात आहे. माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, अंजली पाटील, उच्च शक्षिति प्राजक्ता वर्दे असे निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार सेने कडे असताना बाहेरच्या पक्षातील लोक पक्षात घेण्याची आवश्यकताच काय? असा प्रश्न घेऊन शिवसेनेचे काही नगरसेवक, पदाधिकारी गुरु वारी मातोश्रीवर गेल्याचे समजते. अश्या परिस्थितीत सेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून सेनेला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत कलह निर्माण होताना दिसत आहे.

Web Title: All parties rebel rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.