अहमदाबाद महामार्ग झाला इन्फर्नो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:14 AM2019-01-23T00:14:22+5:302019-01-23T00:14:29+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा टँकर आणि ट्रकला सतत लागणाऱ्या आगींमुळे इन्फर्नो ठरू लागला आहे.

Ahmedabad highway took Inferno | अहमदाबाद महामार्ग झाला इन्फर्नो

अहमदाबाद महामार्ग झाला इन्फर्नो

googlenewsNext

- शशिकांत ठाकूर 

कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा टँकर आणि ट्रकला सतत लागणाऱ्या आगींमुळे इन्फर्नो ठरू लागला आहे. त्याला कायदा आणि नियम धाब्यावर बसविण्याची वृत्ती जशी जबाबदार आहे त्याचप्रमाणे एकदा वसई सोडले की, मार्गात कुठेही अग्निशमन यंत्रणा निर्माण न करण्याची बेफिकीरीही कारणीभूत आहे.
गेल्या महिन्यात ओव्हरलोड भरलेल्या गवताच्या भाºयांच्या संपर्कात वीजवाहक तारा आल्याने चार ट्रकला आग लागली होती. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. परंतु वित्तहानी मोठी झाली. त्यापाठापाठ मंगळवारी हायड्रोजनच्या ट्रंकरला आग लागली. त्यात एकाचा जीव गेला तर तीन जखमी झाले. याला कारण वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त गवत अथवा माल भरणे, त्याची उंची निर्धारित उंचीपेक्षा जास्त ठेवणे, लोंबणाºया विजवाहकतारा या ताणून न बांधणे ही कारणे जशी जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे आपला पेट्रोलपंप अथवा हॉटेल याचा धंदा जोरात व्हावा यासाठी महामार्गाचा डिव्हायडर तोडून तेथे तो ओलांडता येतील अशी सोय करवून घेणे.असे प्रकारही कारणीभूत आहेत. ज्या महामार्गावर वाहनांची गती ताशी शंभर कि.मी वा त्याच्या जवळपास असते त्यावर क्रॉसिंग शक्यतो नसावेत हा संकेत आहे. महामार्गा तसाच बांधला आहे. परंतु अवैध क्रॉसिंग निर्माण केल्याने भर वेगाने येणारे वाहन ओलांडणाºया वाहनावर धडकते हा नेहमीचा अनुभव आहे. अनेकदा असे तोडलेले डिव्हायडर पुन्हा पूर्ववत केले ते परत तोडले जातात . त्यामुळेही अपघात होतात. वसई सोडल्यानंतर ज्याच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे असे एकही दल नाही. जेथे त्या आहेत तेथील बंब येईपर्यंत तासन्तास निघून जातात. यावर तोडगा निघेपर्यंत हे अपघात सुरूच राहतील.
>सुसज्ज दल आवश्यक
डहाणूमधील वीजप्रकल्प आणि तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प धोकादायक रसायनांची वाहतूक करणारे हजारो टँकर अशी स्थिती असतांना महामार्गालगत तळ असलेली आधुनिक यंत्रणा असलेले अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी सरकार सतत दुर्लक्षित आलेले आहे. ती तातडीने पूर्ण होण्याची असलेली आवश्यकता या अपघातामुळे मंगळवारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशी चर्चा स्थानिकात सुरू आहे.

Web Title: Ahmedabad highway took Inferno

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.