आगरीसेना आज राष्ट्रीय महामार्ग रोखणार, मागण्यांसाठी भूमिपुत्र आंदोलनात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 02:34 AM2019-02-08T02:34:03+5:302019-02-08T02:34:22+5:30

भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे. विकासात भूमीपूत्रांना स्थान दिले जात नाही.

Agraseena will stop the National Highway today, and will be going to the Bhayiputra agitation for the demands | आगरीसेना आज राष्ट्रीय महामार्ग रोखणार, मागण्यांसाठी भूमिपुत्र आंदोलनात उतरणार

आगरीसेना आज राष्ट्रीय महामार्ग रोखणार, मागण्यांसाठी भूमिपुत्र आंदोलनात उतरणार

googlenewsNext

वसई  - भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे. विकासात भूमीपूत्रांना स्थान दिले जात नाही. अशा अनेक मागण्या घेऊन शुक्रवारी पालघर जिल्हा आगरी सेना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करणार आहे.

आगरी सेना नेते कैलास पाटील, आगरी सेना वसई अध्यक्ष भूपेश कडूलकर तसेच पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतित शिरसाड नाका, राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८ वर सकाळी १० वाजता चक्का जाम करण्यात येणार आहे. या महामार्ग रोको आंदोलनास शिवसेनेनेही जाहिर पाठींबा दर्शवला असून, कांग्रेस, मनसे, रिपाईसह इतर पक्षदेखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. पालघरचा विकास हा भूमीपुत्रांच्या जागेवरच झाला आहे. त्यावेळी मोठे मन करून त्यांनी विकासाला जागा दिलेल्या आहेत. परंतु, आता पुन्हा मोठ्या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. मात्र, त्यांना कवडीमोल भावाने मोबदला दिला जातो. त्यांना रोजगार दिला जात नाही. मच्छीमारांना नुकसान भरपाई, वाढीव घरपट्टी, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, वाढीव विजबिले आणि प्रश्न, म्हाडाचा रखडलेला गृहप्रकल्प, डबघाईस आलेला रेती व्यवसाय, पालिका क्षेत्रातील बांधकाम नियमांकडे दुर्लक्ष, माहितीच्या अधिकाराची पायमल्ली, नारंगी जवळचा नियोजीत उड्डाणपूल, महामार्गानजीक नवीन पोलीस चौकी बनवणे आदि मागण्या आहेत.

या रास्ता रोकोला पन्नास हजाराहून अधिक भूमिपूत्र एकवटून महामार्ग रोखणार असल्याचे आगरी सेनेकडून सांगण्यात आले.या आंदोलनास शिवसेनेचे समर्थन पत्र आगरी सेना नेते कैलाश पाटिल व जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटिल (मामा) यांना पालघर उपजिल्हा प्रमुख निलेश तेडोंलकर, दिलिप पिंपळे, तालुका प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांनी दिले.

स्थानिक भूमिपूत्रांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी, मागण्यांसाठी आगरी सेनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे. शिवसेना, कॉग्रेस, मनसे, रिपाई पक्षदेखील आमच्यासोबत आहेत.
-जनार्दन (मामा) पाटील, अध्यक्ष, पालघर जिल्हा आगरी सेना

Web Title: Agraseena will stop the National Highway today, and will be going to the Bhayiputra agitation for the demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर