Action on street users using gas; 17 people arrested | रस्त्यावर गॅस वापरणाऱ्यांवर कारवाई; १७ जणांना अटक
रस्त्यावर गॅस वापरणाऱ्यांवर कारवाई; १७ जणांना अटक

विरार : रस्त्यावर उघडपणे सिलेंडरचा वापर करून पदार्थ बनवून विकणाºयांवर वालीव पोलिसांनी करवाई केली आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यात हि मोहीम सुरु असून वळीव पोलिसांनी आता पर्यंत १७ जणांवर अटक केली आहे व त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुरु आहे.
गरम पदार्थ बनवून विकणे हा नवीन व्यवसाय वसई स्थानकाजवळ जोर धरत आहे. वसई स्थानका बाहेर मोठ्या प्रमाणात ओद्यौगिक इमारती असल्यामुळे याठिकाणी नागरिकांची गर्दी असते. सकाळ संध्याकाळ कामावर जाणाºया व येणाºया लोकांना गरमा गरम नाश्ता पुरविण्या करीता रस्त्यावर उघडपणे सिलेंडर गॅस लावून पदार्थ बनवले जातात. पण हे पदार्थ एखाद्याच्या जीवावर बेतू शकतात. रस्त्यावर उघडपणे गॅस व स्टोव्ह लावून तेलात पदार्थ तळणे हा गुन्हा आहे. तर यामुळे कोणाला हि गंभीर दुखापत होऊ शकते. एखादा पदार्थ तळताना तेल पडू शकते किंवा एखाद्या गाडीला आग लागू शकते इ. गोष्टींमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी वळीव पोलिसांनी अशा फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. हि कारवाई संपूर्ण पालघर जिल्ह्यात सुरु आहे परंतु वसई स्थानक हे अधिक गजबजलेले ठिकाण असल्याने याठिकाणी या फेरीवाल्यांचे प्रमाण जास्त आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास वळीव पोलिसांनी सुरवात केली होती. २०१८ मध्ये पोलिसांनी ५० जणांवर कारवाई केली होती तर २०१९ मध्ये आतापर्यंत १७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच वळीव पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून त्यांच्यावर कारवाई सुरु आहे.

कोणत्याही प्रकारचा सिलेंडर असूदे कायद्याप्रमाणे अटक करण्यात येईल. या फेरीवाल्यंकडे परवाने देखील नसतात यामुळे कोणाचा जीव देखील जाऊ शकतो त्यामुळे या फेरीवाल्यांना लवकर सोडणार नाही. कारवाई पूर्ण झाल्याशिवाय अजिबात आम्ही यांना जाऊ देणार नाही. कारण हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
- दामोदर बांदेकर,
पोलीस निरीक्षक, वळीव


Web Title:  Action on street users using gas; 17 people arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.