जव्हार : जव्हार शहरात रोड रोमीओनी धुमाकूळ घातला असून कमी वयोगटातील व नियमांची पायमल्ली करणाऱ्या १२१ वाहनांवर जव्हार पोलीसांच्यावतीने मंगळवारी कारवाई करण्यात आली.
व्हॅलेंटाईन डेला स्टंटबाज रोमीयोंना चाप बसावा म्हणून पोलीस उप निरक्षक महादेव शेलार व ढाकरे व त्यांच्या टीमने व्हारमध्ये टॉवर, सिल्व्हासा नाका, तीन बत्ती नाका, नाशिक नाका अशा विविध ठिकाणी वाहनांची कसून तपासणी सुरू केली होती, दिवसभरात १२१ दुचाकी व चारचाकी वाहनांवर लायसन्स नसणे, कागदपत्रे नसणे, इन्श्युअरन्स नसणे अशा विविध कारणांवरून कारवाई करण्यात आली असून, यातील चार वाहनांचे आॅन आॅफ स्वीच तुटलेले व त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे ती चोरीची असल्याच्या संशयावरून जव्हार पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. जव्हार पोलीसांच्या या कामगीरीमुळे शहरातील नागरीक व पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे. (वार्ताहर)