खुनातील आरोपींना आजन्म कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:50 AM2019-07-19T00:50:28+5:302019-07-19T00:50:37+5:30

पूर्वेकडील वाकणपाडा येथे चारित्र्याच्या संशयावरून पती आणि भावाने एका महिलेला अंगावर रॉकेल टाकून जीवे ठार मारले.

The accused are sentenced to life imprisonment | खुनातील आरोपींना आजन्म कारावास

खुनातील आरोपींना आजन्म कारावास

Next

नालासोपारा : पूर्वेकडील वाकणपाडा येथे चारित्र्याच्या संशयावरून पती आणि भावाने एका महिलेला अंगावर रॉकेल टाकून जीवे ठार मारले. वालीव पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ही घटना २६ जुलै २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी मंगळवारी वसई न्यायालयाने दोन्ही आरोपींना आजन्म कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पती मनोज रामजी चौरे (३५) आणि महिलेचा भाऊ बाबूराव निंबाजी येसनकर (४७) अशी या आरोपींची नावे आहेत.
वाकणपाडा परिसरात राहणाऱ्या महिलेचा पती आणि भाऊ तिचा चारित्र्यावरून संशय घेत असत. यातूनच या दोघांनी रॉकेल अंगावर टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला रुग्णालयात भरती केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. सहा. पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून वसई न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याप्रकरणाची सुनावणी वसई न्यायालयात सुरु होती.
याप्रकरणी मंगळवारी न्यायालयाने आरोपींना आजन्म कारावास शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सनावली आहे. यावेळी सरकारी वकील म्हणून जयप्रकाश पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: The accused are sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.