पाड्यावरच्या शाळेत अवतरली थ्रीडी सूर्यमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:27 AM2019-07-20T00:27:47+5:302019-07-20T00:27:54+5:30

चला मुलांनो आज पाहू या शाळा चांदोबा गुरुजींची’, असे म्हणत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना कवेत घेऊन संपूर्ण थ्रीडी सूर्यमालेचा अनुभव विजय वाघमारे गुरुजींनी दिला.

3D Solar System | पाड्यावरच्या शाळेत अवतरली थ्रीडी सूर्यमाला

पाड्यावरच्या शाळेत अवतरली थ्रीडी सूर्यमाला

googlenewsNext

- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : ‘या वाऱ्याच्या बसूनी विमानी, सहल करूया गगनाची, चला मुलांनो आज पाहू या शाळा चांदोबा गुरुजींची’, असे म्हणत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना कवेत घेऊन संपूर्ण थ्रीडी सूर्यमालेचा अनुभव विजय वाघमारे गुरुजींनी दिला. घोलवड केंद्रातील शंकरपाडा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हा आगळावेगळा अनुभव घेतला.
पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावरील ही जिल्हा परिषदेची शाळा. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘विज्ञान परिसर अभ्यास’ या विषयातील ‘सूर्यमाला’ या घटकाच्या अध्यापनासाठी डिजीटल साधनांचा वापर करण्यात आला. यावेळी नेहमीप्रमाणे प्रोजेक्टर वा संगणक न वापरता ‘एक्स्प्लोरर फॉर मर्ज क्यूब’ या मोबाइल अ‍ॅपचा वापर केल्याने चक्क थ्रीडी सूर्यमालाच वर्गात अवतरली. गुरुजींनी तळहातावर पकडलेल्या मोबाइलमधून सूर्य, बुध, शुक्र , पृथ्वी हे ग्रह पाहून विद्यार्थ्यांचे डोळ्यांत आनंद मावेना. तर काही दिवसांपूर्वीच नासाच्या रोव्हर २०२० सह आपल्या नामखुणा ज्या ग्रहावर पाठविण्याचे सोपस्कार शाळेने पूर्ण केले, तो मंगळग्रह देखील विद्यार्थ्यांनी पाहिला. तर गुरू, कडा असलेला शनी, युरेनस आणि नेपच्युन आदींना पाहून विद्यार्थ्यांची चंगळ झाली. दरम्यान, आदिवासी पाड्यावरच्या शाळेत असे तंत्रस्नेही शिक्षक लाभल्याने थ्रीडी सूर्यमाला पाहण्याचा अनुभव मिळाला.
>सूर्यमाला कशी पाहणार
सूर्यमालेचा थ्रीडी अनुभव देण्यासाठी गुगल प्लेस्टोरवरच्या ‘एक्सप्लोअरर फॉर मर्ज क्यूब’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर त्याचा मार्कर इमेज असणारे मर्ज क्यूबची प्रिंट अ‍ॅपवर स्कॅन करून घेतल्यास प्रत्यक्ष सूर्यमालाच पाहायला मिळते.
>मानवी कक्षेबाहेरील खगोलीय संकल्पना तारे ग्रह उपग्रह धूमखेतू उल्का, इत्यादी घटक शिकवताना प्लेस्टोअरवरील विविध शैक्षणिक अ‍ॅपचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना खगोलीय संकल्पना समजण्यास मदत होते.’
- विजय वाघमारे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शंकरपाडा)

Web Title: 3D Solar System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.