१५० सफाई कर्मचा-यांचा पगार कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:55 PM2018-02-23T23:55:56+5:302018-02-23T23:55:56+5:30

महापालिकेच्या सफाई विभागात कर्मचारी म्हणून पालिकेत भरती झालेले साहेबांची खुर्ची बळकावून बसले आहेत

150 clean workers' salary cut | १५० सफाई कर्मचा-यांचा पगार कापला

१५० सफाई कर्मचा-यांचा पगार कापला

Next

भिवंडी : महापालिकेच्या सफाई विभागात कर्मचारी म्हणून पालिकेत भरती झालेले साहेबांची खुर्ची बळकावून बसले आहेत. अशा कर्मचाºयांना मूळ जागी पाठवले असता त्यांनी शहर स्वच्छता न केल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांचे १५ दिवसांचे पगार कापण्यात आले आाहेत.
महापालिकेतील शहर सफाई विभागात सुमारे २४०० सफाई कर्मचारी असून त्यापैकी १५० पेक्षा अधिक सफाई कामगार आजी-माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने कार्यालयात खुर्ची बळकावून ‘साहेब’ बनले आहेत. पालिका आयुक्त योगेश म्हसे व स्वच्छतादूत महापौर जावेद दळवी यांनी शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्याकरिता पालिकेचे मनुष्यबळ कमी असल्याचे आढळल्याने आयुक्त म्हसे यांनी स्वच्छता विभागाची झाडाझडती घेतली. तेव्हा सुमारे १५० सफाई कामगार पालिकेच्या विविध भागात काम करत असल्याचे आढळले. त्यामुळे या सफाई कामगारांना पालिकेच्या आस्थापना विभागामार्फत मूळ जागेवर काम करण्याचे आदेश बजावले.
हे सफाई कामगार आजी-माजी नगरसेवक व तत्कालीन आस्थापना विभागाच्या अधिकाºयांशी संगनमत करून ‘साहेब’ बनले होते. त्यामुळे त्यांनी या आदेशाला न जुमानता थेट न्यायालयात जाण्याचा मार्ग अवलंबला. मात्र उच्च न्यायालयाने मागील महिन्यात या कामगारांना मूळजागी काम करण्याचा निर्णय दिला. मात्र त्यांनी या निर्णयाविरूध्द दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयातील पुढच्या बेंचकडे दावा दाखल केला. त्यानुसार कामगारांना ‘जैसे थे’ स्थितीत राहण्यास सांगितले आणि २६ फेब्रुवारीला सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणी पालिकेच्या वकील पॅनेलने कॅव्हेट दाखल न केल्याने कामगारांना पुढील न्यायालयात जाण्याची मुभा मिळाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, आयुक्त योगेश म्हसे यांनी जे सफाई कामगार नियमीत हजेरी लावून मूळ जागेवर काम करीत नाही त्यांचा अहवाल सफाई विभागाकडून मागवला आहे. तसेच सफाई अधिकाºयांच्या अहवालानुसार अशा सफाई कामगारांचा १५ दिवसांचा पगार न देण्याचा निर्णय घेतल्याने सफाई कामगारांना चांगलीच चपराक बसली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

Web Title: 150 clean workers' salary cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.