वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी वसई-विरारमध्ये १२ उड्डाण पूल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:47 AM2019-07-19T00:47:39+5:302019-07-19T00:47:51+5:30

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विविध विभागातील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.

12 flyovers in Vasai-Virar to escape traffic jams? | वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी वसई-विरारमध्ये १२ उड्डाण पूल?

वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी वसई-विरारमध्ये १२ उड्डाण पूल?

Next

वसई : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विविध विभागातील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. हा ताण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये सुरुवातीला ३ उड्डाण पूल प्रस्तावित होते, मात्र आता वसई, विरार नालासोपारा मिळून एकूण १२ उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. दरम्यान हे उड्डाण पूल बांधण्यासाठी महापालिकेला अंदाजे ३०४ कोटी
रुपये खर्च येणार असून त्याच्या मान्यतेचा प्रस्ताव शुक्र वारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर वसई विरार उपप्रदेशातील एमएमआरडी प्राधिकरणामार्फत हे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत.
वसईचे शहरी व ग्रामीण असे दोन भाग असून वसई-विरार शहर महापालिका ही अगदी मुंबईला लागून असल्याने येथे दोन दशकात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होऊन लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने शहरात वाहतूक कोंडीचा त्रासही वाढला. या सर्व बाबींचा विचार करून वाहतूक कोंडीवर उपाय आणि नागरिकांना मोकळा श्वास मिळावा यासाठी महानगरपालिका विविध ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे १२ उड्डाण पूल बांधण्याचे काम हाती घेणार आहे. तसेच हे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
>उड्डाण पूल व त्यांचे सर्वेक्षण पूर्ण!
वसई विरार नालासोपारा येथील वाहतूक कोंडी व त्यांचे नियोजन व ती सुरळीत आज शहरात उड्डाण पूल उभारणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने मे.टंडन अ‍ॅण्ड कंपनीमार्फत उड्डाण पूलासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आवश्यक असलेल्या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यासाठी त्यांनी सूचवले असून यासाठी होणाºया खर्चाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे.
>कुठे उभारणार उड्डाणपूल!
माणिकपूर नाका, रेंज आॅफिस, गोखिवरे, श्रीप्रस्थ पाटणकर पार्क जंक्शन, चंदननाका जंक्शन, लक्ष्मी शॉपिंग सेंटर, बोळींज खारोडी नाका, विज्ञान उद्यान, मनवेल फाटा, फुलपाडा जंक्शन, बाभोळा नाका, नवघर पूर्व वसंत नगरी, नारंगी, साईनाथ नगर.
>प्रस्तावित उड्डाणपूल
उड्डाणपुलाचे ठिकाण अंदाजे खर्च
माणिकपूर नाका २८ कोटी ९६ लाख
रेंज आॅफिस, गोखिवरे १९ कोटी ८१ लाख
श्रीपस्थ पाटणकर १५ कोटी ५६ लाख
पार्क जंक्शन
चंदननाका जंक्शन १९ कोटी ११ लाख
लक्ष्मी शॉपिंग सेंटर ५० कोटी २३ लाख
बोळींज खारोडी नाका १६ कोटी ८९ लाख
विज्ञान उद्यान १६ कोटी ८९ लाख
मनवेल फाटा १८ कोटी २२ लाख
फुलपाडा जंक्शन १८ कोटी ८९ लाख
बाभोळा नाका ३१ कोटी ८१ लाख,
नवघर पूर्व वसंत नगरी ५१ कोटी ४४ लाख
नारंगी, साईनाथ नगर १६ कोटी ८९ लाख
>सभेत १२ उड्डाण पुलांच्या बांधकाम मान्यतेसाठीचा प्रस्ताव येणाºया सभेपुढे ठेवण्यात आला असून त्याला मान्यता मिळाल्यास होणारा खर्च आणि एकूण प्रकल्पांची माहिती तसेच बांधण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात येईल.
-राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता,वसई-विरार महापालिका

Web Title: 12 flyovers in Vasai-Virar to escape traffic jams?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.