महिला धडकल्या जि.प. सदस्यांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:29 PM2019-02-22T23:29:24+5:302019-02-22T23:29:54+5:30

सध्या गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे;पण महिलांच्या या समस्येकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत गावातील जलसंकटावर मात करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलण्यात यावे या मुख्य मागणीसाठी घागर घेऊन निघालेला महिलांचा मोर्चा सुरूवातीला ग्रा.पं. कार्यालयात पोहोचला.

Women's Strike Members' home | महिला धडकल्या जि.प. सदस्यांच्या घरी

महिला धडकल्या जि.प. सदस्यांच्या घरी

Next
ठळक मुद्देजलसंकटावर मात करण्याची रेटली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : सध्या गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे;पण महिलांच्या या समस्येकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत गावातील जलसंकटावर मात करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलण्यात यावे या मुख्य मागणीसाठी घागर घेऊन निघालेला महिलांचा मोर्चा सुरूवातीला ग्रा.पं. कार्यालयात पोहोचला. परंतु, तेथे सरपंच नसल्याचे लक्षात येताच महिलांनी आपला मोर्चा जि.प. सदस्य चंद्रकांत ठक्कर यांच्या घराकडे वळविला. महिलांनी ठक्कर यांचे निवासस्थान गाठून त्यांना महिलांची समस्या समजावून सांगितली.
गावातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची असली तरी २८ फेबु्रवारीपर्यंत सदर विभागाकडून नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वीच गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना त्याकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे महिलांच्या अडचणीत भर पडली असून ग्रा.पं. प्रशासनाचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त महिलांनी हातात घागर घेऊन ग्रा.पं. कार्यालय गाठले. तेथे सरपंचच नसल्याचे लक्षात येताच महिलांनी आपला मोर्चा जि.प. सदस्य चंद्रकांत ठक्कर यांच्या निवासस्थानाकडे वळविला. ठक्कर यांचे निवासस्थान गाठल्यावर आंदोलनकर्त्या महिलांनी आपली अडचण जि.प. सदस्यांना सांगितली. त्यावर ठक्कर यांनी ग्रा.पं. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य सूचना केल्या. शिवाय आंदोलनाचा इशाराही दिला. आंदोलनात संगीता कामडी, वैशाली नरड, कल्पना घोडे, शशिकला हरणे, कल्पना बडे, इंदिरा नरड, संगीता तेलरांधे, वंदना देशमुख, शोभा ढोले, शोभा नरड, मंगला काटकर, कमला साठोणे, शशिकला वंदाडे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Women's Strike Members' home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी