महिलांनी स्वसुरक्षेसाठी सक्षम झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:21 PM2018-02-19T22:21:43+5:302018-02-19T22:22:03+5:30

देशात दररोज ६२४ महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. हा सरकारी आकडा आहे. पण अशा कितीतरी महिला आहेत ज्या तक्रार करण्यास धजावत नाही.

Women should be able to self-help | महिलांनी स्वसुरक्षेसाठी सक्षम झाले पाहिजे

महिलांनी स्वसुरक्षेसाठी सक्षम झाले पाहिजे

Next
ठळक मुद्देउषा विश्वकर्मा : स्वरक्षणाचे मुलींना दिले धडे

आॅनलाईन लोकमत
हिंगणघाट : देशात दररोज ६२४ महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. हा सरकारी आकडा आहे. पण अशा कितीतरी महिला आहेत ज्या तक्रार करण्यास धजावत नाही. समाज आणि पोलीस प्रत्येक वेळी मदतीला येणार नाही. महिलांनी आपली सुरक्षा आपणच केली पाहिजे, असे मत रेड ब्रिगेड लखनऊ संस्थेच्या संस्थापक उषा विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.
रा.सू. बिडकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रा. डॉ. उषा थुटे, प्राचार्य बी.जी. आंबटकर, आलोक सिंग, प्रा. राजू अवचट, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. शरद विहिरकर, प्रा. राजू निखाडे, प्रा. अभिजित डाखोरे यांची उपस्थिती होती. सरोजिनी नायडू जयंतीनिमित्त हैदराबाद ते लखनऊ प्रेरणा यात्रा काढण्यात आली. ही यात्रा हिंगणघाट येथे पोहचली असता संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यात्रेचे नेतृत्व उषा विश्वकर्मा व आलोक सिंग करीत आहे. यानंतर बोलताना उषा थुटे म्हणाल्या, महिलांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. त्यांचे शारीरिक व मानसिक बळ वाढविणे आवश्यक आहे. हे बळ सरोजिनी नायडू यांच्या जीवन कायार्तून मिळते. तर आलोक सिंग यांनी सरोजिनी नायडू यांचा जीवन परिचय दिला. प्रास्ताविक प्रांजली डाखोरे यांनी केले. संचालन अभिजित डाखोरे यांनी केले तर आभार प्रा. विहिरकर यांनी मानले. शेखर कुटे, आशिष भोयर, रासेयो विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहकार्य केले.

Web Title: Women should be able to self-help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.