वृक्षदिंडीचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:27 PM2018-07-03T23:27:33+5:302018-07-03T23:29:19+5:30

राज्यशासनाच्या १ लक्ष १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दीष्टाला पूर्ततेकडे नेण्यासाठी गोदिंया जिल्ह्यातून प्रारंभ झालेल्या वृक्षदिंडीचे वर्धा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातून सोमवारी या दिंडीचे वर्धा जिल्ह्यात आगमन झाले.

Welcome to the Wilderness District | वृक्षदिंडीचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

वृक्षदिंडीचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

Next
ठळक मुद्देसेलूत दिली विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीची शपथ : नंदोरी सिमेवरही झाले वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यशासनाच्या १ लक्ष १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दीष्टाला पूर्ततेकडे नेण्यासाठी गोदिंया जिल्ह्यातून प्रारंभ झालेल्या वृक्षदिंडीचे वर्धा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातून सोमवारी या दिंडीचे वर्धा जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी नंदोरी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिंडीच्या वतीने स्थानिक हनुमान टेकडीवर मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर दिंडी सेलू मार्गे नागपूरकडे रवाना झाली.
मंगळवारी आयटीआय टेकडीवर खा. रामदास तडस, आ. प्रा. अनिल सोले, डॉ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक संदीप भोलाप्रसाद त्रिवेदी, नगरसेविका श्रेया देशमुख, वरूण पाठक, भाजप शहराध्यक्ष प्रशांत बुरले, सुरेश पट्टेवार, सतीश मिसाळ, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे आदी उपस्थित होते. यावेळी वृक्षदिंडीतील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जागतिक तापमानाची होत असलेली वाढ यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम अंत्यत आवश्यक आहे. मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यात आले. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन आ. प्रा. अनिल सोले यांनी याप्रसंगी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वड, आवळा, बेल, पिंपळ आदी पाच प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी खा. रामदास तडस यांनी वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन नागरिकांना केले. या कार्यक्रमाला सहाय्यक उपवनसंरक्षक बडेकर, सामाजिक वनीकरणाचे संचालक जोशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुरलीधर बेलखोडे यांनी केले तर आभार निलेश कराळे यांनी मानले.
तत्पूर्वी सोमवारी नंदोरी येथे विकास विद्यालयाच्या प्रागंणात आ. प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्वातील वृक्षदिंडीचे चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आगमण झाले. यावेळी विकास विद्यालयाच्या प्रागंणात आ. सोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे, समुद्रपूर भाजपा तालुकाध्यक्ष संजय डेहणे, नंदोरीच्या जि.प. सदस्य शुभांगी डेहणे, सरपंच मुक्ता खुडसंगे, विकास विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर कोळसे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अवचट, उगे, नारायणपूरचे सरपंच युवराज तांदुळकर व नंदोरी परिसरातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवारी वर्धा येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर वृक्षदिंडी नागपूरकडे रवाना झाली. यावेळी सेलू येथे या दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. रामदास आंबटकर, जि.प. सभापती सोनाली कलोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला तहसीलदार महेंद्र सोनाने, गटविकास अधिकारी एस.एम. कोल्हे, तलाठी कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी व गुड शेफर्ड शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम हिंगणी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून घेण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीची शपथ देण्यात आली. संचालन संजय चौधरी, प्रास्ताविक वाढई तर आभार अशोक कलोडे यांनी मानले. नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वृक्षप्रेमी म्हणून गौरविण्यात आले
हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा (चोरस्ता) येथे वृक्ष दिंडीचे आगमन झाले. यावेळी विधान परिषद सदस्य आ.अनिल सोले यांच्यासह खा. रामदास तडस ,माजी खा.सुरेश वाघमारे, पं.स.सदस्य प्रशांत चंदनखेडे, माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या उपस्थितीत धोत्रा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वृक्षरोपणाचे महत्व विद्यार्थी व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमात अल्लीपुर येथील वृक्षमित्र निलेश धोंगडे यांच्या कामाची दखल घेऊन आ.अनिल सोले यांच्या हस्ते प्रमाणप्रत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी आकाश पडोळे ,मयूर पारिसे, नयन हिंगे, केतन हिंगे उपस्थित होते.
 

Web Title: Welcome to the Wilderness District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.