फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 09:47 PM2019-05-18T21:47:06+5:302019-05-18T21:47:33+5:30

शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. त्यात शहरालगतच्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायतचाही समावेश असून या परिसरातील जलवाहिनी तीन दिवसापासून फुटली आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना जीवन प्राधिकरण किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.

Water wastage due to water scorps | फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

Next
ठळक मुद्देआलोडीतील प्रकार । पंधरा दिवसापासून नागरिक मात्र तहानलेले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. त्यात शहरालगतच्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायतचाही समावेश असून या परिसरातील जलवाहिनी तीन दिवसापासून फुटली आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना जीवन प्राधिकरण किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.
जिल्ह्यात सर्वत्रच पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. शहरात पाचव्या दिवशी तर लगतच्या ग्रामपंचायत परिसरात पाच ते आठ दिवसादरम्यान पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नगरपालिका, ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले जात आहे. असे असतानाही यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळेच वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायतच्या हद्दीतील आलोडी परिसरातील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये पंधरादिवसापासून पाणीपुरवठा झाला नसल्याने पाण्याकरिता हाहाकार आहे.
पाण्यासाठी नागरिक दहादिशा भटकत असतानाच याच परिसरातील पाणीपुरवठ्याची जलवाहिनी मागील तीन दिवसापासून फुटलेली आहे. त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाहत असून मोठे डबके साचले आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला कळविले असता अद्यापही दुरुस्ती केली नाही. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचेही लक्ष गेले नाही. शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुटी असल्याने या दिवशी पाण्याचा उपव्यय कायमच राहणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे नागरिकांच्या घशाला कोरड पडली असताना दुसरीकडे यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पाणी वाया जात असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.
पूर्वीच पाणीटंचाई
पूर्वीच या भागातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच जलवाहिनी फुटून स्वच्छ पाण्याचा अपव्यय होत असल्याने सुजान नागरिकांकडून कार्यवाहीची जबाबदारी असलेल्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Web Title: Water wastage due to water scorps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.